पूजा खेडकर यांच्या आईवर मोठी कारवाई! पिस्तुल दाखवून शेतकऱ्यांना धमकावणे पडले महागात…

वादग्रस्त ट्रेनी आयएएस पूजा खेडकरची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. पुण्यात असताना तिचे अनेक कारनामे समोर आले आहेत. यामुळे तिची बदली करण्यात आली. मात्र आता या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांच्या आई मनोरमा खेडकर यांचा अरेरावी करतानाचा व्हिडिओ समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

बंदुक घेऊन मुळशीतल्या शेतकऱ्यांना धमकावल्याचा हा व्हिडिओ आहे. आता याप्रकरणी खेडकर यांच्याविरोधात पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी मनोरमा खेडकर यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. यामुळे यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या होत्या.

मनोरमा या बंदबक दाखवून एक शेतकऱ्याला धमकावत असल्याचे दिसत होते. याचप्रकरणी त्यांच्यावर गु्न्हा दाखल झाला आहे. मनोरमा खेडकर यांच्यासह दिलीप खेडकर, अंबादास खेडकर, दोन पुरुष बाउंसर, दोन महिला बाउन्सर आणि घटनेवेळी त्यांच्यासोबत आलेल्या इतर गुंड व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यामुळे आता चौकशी होणार असून त्यांना चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, शेतकरी पंढरीनाथ कोंडीबा पासलकर यांच्या फिर्यादीनंतर गुन्हा दाखल झाला. कलम 323, 504, 506, 143, 144, 147, 148, 149, 3, 25 या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

यामध्ये बेकायदा पिस्तूल बाळगून धमाकावल्याप्रकरणी सुद्धा कलम लावण्यात आलं आहे. त्यामुळे आता मनोरमा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचं दिसत आहे. तसेच त्यांच्याकडे असलेल्या गाड्यांची देखील चौकशी होणार आहे.

दरम्यान, पूजा खेडकर हिच्या बाबत देखील केंद्रीय स्थरावर चौकशी केली जाणार आहे. यामुळे तिच्या अडचणीत देखील वाढ होणार आहे. याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते देखील आक्रमक झाले असून याबाबत चौकशी करण्याची मागणी करत आहेत.