मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी, धक्कादायक माहिती आली समोर…

राज्यातील मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी आक्रमक भूमिका घेतलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले आहे. याबाबत त्यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. सलाईन लावून उपोषण करण्याला काहीही अर्थ नाही. त्यामुळे मी उपोषण स्थगित करत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

असे असताना आता एक महत्वाची माहिती समोर आली आहे. नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्या प्रकरणी पुणे न्यायालयानं मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यामुळे आता सरकारचा हा डाव असल्याचे सांगितले जात असून मराठा समाज आक्रमक झाला आहे.

पुण्यातील एका नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्या प्रकरणी मनोज जरांगे- पाटील यांच्यासह अन्य दोघांविरोधात पुण्यातील कोथरुड न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता याबाबत माहिती समोर आली आहे. या प्रकरणी न्यायालयातील सुनावणीला गैरहजर राहिल्यानं मनोज जरांगे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे.

दरम्यान, 2013 मध्ये मनोज जरांगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एका नाट्य प्रयोगाचे आयोजन केले होते. त्या नाट्य प्रयोगाची ठरलेली रक्कम न दिल्याचा आरोप नाट्यनिर्मात्याने केला होता, मात्र इतके दिवस झाल्यानंतर हे प्रकरण आता बाहेर आल्याने चर्चा सुरू झाली आहे.

2013 मध्ये कोथरूड परिसरात जरांगे पाटील यांनी नाटकांचे प्रयोग आयोजित करून त्याचे पैसे दिले नाहीत, असा आरोप पीडित व्यक्तीनं केला. या प्रकरणी जरांगे यांच्यासह अर्जुन प्रसाद जाधव आणि दत्ता बहीर यांच्याविरोधात फसवणूक केल्याची तक्रार कोथरूड पोलिसात 2013 मध्ये दाखल करण्यात आली. 

याबाबत जरांगे यांनी सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी नुकतंच एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा केली. मला जेलमध्ये टाकण्याचा आणि मारण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.