ब्रेकिंग! इंडिया आघाडीची एकजुट फुटली? मोदी सरकारच्या बैठकीला ‘हे’ दोन बडे नेते जाणार…

देशात लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला. भाजपच्या जागा कमी झाल्या. मात्र सत्ता कायम आहे. इंडिया आघाडीनेही या निवडणुकीत मोठी कामगिरी करताना 230 जागांवर विजय मिळवला. यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. यामुळे आगामी निवडणुका भाजपसाठी अवघड जाणार आहेत.

आता विरोधकांचा आवाज चांगलाच वाढला आहे. पण आता याच विरोधकांच्या इंडिया आघाडीची धाकधूक दोन पक्षांनी वाढवली आहे. याचे कारण म्हणजे मोदी सरकारने बोलावलेल्या नीती आयोगाची बैठक आज होत आहे. या बैठकीत विविध राज्यांचे मुख्यमंत्री, बडे नेते सहभागी होणार आहेत.

विरोधकांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला आहे. पण असे असताना आता इंडिया आघाडीतील दोन पक्षांनी या बैठकीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत राजकीय चर्चा सुरू झाली आहे. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे इंडिया आघाडीतील दोन्ही नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

इतर विरोधातील मुख्यमंत्र्यांनी मात्र या बैठकीला जाणार नसल्याचे सांगितले आहे. विरोधकांच्या इंडिया आघाडीतील नेत्यांनी अर्थसंकल्पात राज्यांना दुय्यम वागणूक दिल्याचा आरोप करत मोदी सरकारने बोलावलेल्या आयोगाच्या बैठकीवर बहिष्कार टाकण्याच्या निर्णय घेतला.

आता ममता बॅनर्जी आणि हेमंत सोरेन यांच्या निर्णयामुळे इंडिया आघाडीच्या एकजुटीला धक्का असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यामुळे येणाऱ्या काळात नेमकं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नीती आयोगाच्या बैठकीतील उपस्थितीवरुन ममता बॅनर्जी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

केंद्र सरकारच्या नीती आयोगाच्या बैठकीला उपस्थित राहून मी माझे विचार मांडणार आहेत. जर त्यांनी माझ्या मतांकडे लक्ष दिले नाही तर तिथेच निषेध नोंदवणार आहे. याच बैठकीत बंगालमध्ये होत असलेल्या राजकीय भेदभावाचा मुद्दा मांडणार असल्याचे ममता बॅनर्जी यांनी सांगितले आहे. यामुळे नेमकं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने आयोगाची नवीन टीम तयार केली आहे. या टीमचे अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी दिल्लीला जाणार आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.