महाराष्ट्रातून तेलंगणाला चाललेल्या ४ ट्रकवर पोलिसांना आला संशय; पाठलाग करून पकडलं, उघडताच हादरले

गडचिरोलीतून मोठी घटना समोर आली आहे. गोवंशाची तस्करी करणाऱ्या चार ट्रकांना पोलिसांनी पकडले आहे. याप्रकरणी मोठ्या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आष्टी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

अहेरीचे प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टीचे पोलिस निरीक्षक कुंदन गावडे यांनी ही कारवाई केली आहे. त्यांच्या पथकाने त्या चार ट्रकांचा ४ किलोमीटर पाठलाग करुन त्यांना पकडले आहे.

पोलिसांनी चार आयशर आणि एक पीकअप वाहन जप्त केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून छत्तीसगडवरुन महाराष्ट्र मार्गे तेलंगाना राज्यामध्ये गोवंश तस्करी सुरु होती. अखेर पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश केला आहे.

गचचिरोलीत अवैध व्यवसायांना थांबवण्यासाठी पोलिस अथक प्रयत्न करत आहे. ते अनेक ठिकाणी छापे टाकत आहे. त्यामुळे गोवंश तस्करी करणारी टोळी दक्षिण भागातील वेगवेगळ्या मार्गांनी ही तस्करी करत आहे. काही मार्गांवर जड वाहनांवर बंदी घातल्यामुळे गुडम मार्गे ही तस्करी सुरु होती.

गोवंश तस्कर आष्टी परिसरातून वाहने पास करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांवरुन येत होते. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यावेळी पोलिसांनी ४ किलोमीटर पाठलाग करुन जनावरांनी भरलेले चार आयशर आणि एक पीकअप वाहन जप्त केले आहे.

या वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात जनावर होते. आष्टी पोलिसांनी केलेली ही सर्वात मोठी कारवाई असल्याचेही म्हटले जात आहे. जप्त केलेली सर्व वाहने ही तेलंगाना राज्यातील आहे. मेडिकलसाठी त्यांना चंद्रपुरला पाठविण्यात आलेले आहे. जनावरांची संख्या जास्त आहे. आकडा सांगता येणार नाही. कारवाई पुर्ण झाल्यानंतर सर्व गोष्टी स्पष्ट करु, असे पोलिसांनी म्हले आहे.