पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अनेक धक्कादायक निकाल समोर येत आहेत. यामध्ये काल पाकिस्तानच्या अर्शद नदीमने दमदार प्रदर्शन केले. यामुळे याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. भालाफेकीच्या फायनलमध्ये आपल्या दमदार कामगिरीने त्याने सगळ्यांना थक्क केलं. भारताचे गोल्ड मेडलचे स्वप्न यामुळे भंगले.
पाकिस्तानचा अर्शद अशी कामगिरी करेल, अशी कोणी अपेक्षा केली नव्हती. पॅरिसमध्ये या रोमांचक फायनलमध्ये त्याने 92.97 मीटर अंतरावर थ्रो करुन नवीन ऑलिम्पिक रेकॉर्ड रचला. नीरज चोप्राने 89.45 मीटर अंतरावर थ्रो करुन रौप्य पदकाला गवसणी घातली. या समन्याकडे सर्व भारतीयांचे लक्ष लागले होते.
असे असताना जॅविलन थ्रोअर अर्शद नदीमने सुवर्ण पदक जिंकल्यानंतर त्याच्यावर चीटिंगचे आरोप होत आहेत. त्याने गोल्ड मेडल जिंकल्यानंतर वाद वाढला आहे. यामुळे त्याने नेमकं काय केलं असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
यामुळे बअर्शद नदीमची डोप टेस्ट करण्याची मागणी होत आहे. जॅवलिन थ्रो च्या फायनलमध्ये अर्शदने 6 वेळा भालाफेकीचा प्रयत्न केला. पहिला थ्रो त्याचा फाऊल होता. मात्र नंतर त्याने अशी काय कामगारी केली त्यामुळे एक रेकॉर्डच झाला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
त्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. अर्शदने दुसऱ्या प्रयत्नात 92.97 मीटर इतक्या दूर अंतरावर भाला फेकला. त्याने 16 वर्षापूर्वी 2008 बीजिंग ऑलिम्पिकमधला रेकॉर्ड मोडला. यामुळे त्याने एक वेगळे रेकॉर्डच आपल्या नावावर केले आहे. यामध्ये ऑलिम्पिक रेकॉर्ड नॉर्वेच्या एंड्रियास थॉरकिल्डसन यांच्या नावावर होता.
त्यांनी 90.57 मीटर अंतरावर थ्रो केला होता. त्याने पुन्हा एकदा 92 मीटर अंतर पार केलं. त्याच्या या कामगिरीवर कोणाला विश्वास बसत नव्हता, मात्र त्याने करून दाखवलं आहे. यामुळे भारताचे स्वप्न पुन्हा एकदा स्वप्नच राहिले आहे. मात्र अनेकांनी अर्शद नदीमवर ड्रग्स घेऊन मैदानात उतरल्याचा आरोप केला आहे. त्याच्या डोप टेस्टची मागणी होत आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.