काँग्रेसचा एक आमदार सोडणार पक्ष, ठाकरेंना धक्का अन् राजकीय घडामोडींना वेग, नेमकं काय घडतंय?

सध्या मुंबईतील वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात वेगवान राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. याठिकाणी मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. येथील विद्यमान आमदार झिशान सिद्दीकी काँग्रेस सोडण्याच्या तयारीत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज वांद्रे पूर्व भागात आहे. हा मुहूर्त साधत झिशान हे अजितदादांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विधानसभा आणि मुंबई महापालिका निवडणुका लक्षात घेत बाबा सिद्दीकींच्या रुपाने राष्ट्रवादीला मुंबईत ताकद मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यामुळे येणाऱ्या काळात नेमकं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून झिशान सिद्दीकीही राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा होती.

सध्या झालेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या सात आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचे समोर आले होते. यामध्ये यांचे नाव समोर आले होते. यात झिशान सिद्दीकी यांच्या नावाचाही समावेश होता. यामुळे काँग्रेसकडून त्यांचे निलंबन करण्यात येईल असे सांगितले जात होते.

त्यामुळे झिशान हे कधीही पक्षाला जय महाराष्ट्र करण्याची शक्यता वर्तवली जात होती. दरम्यान, काँग्रेसमधील हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने तेही शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. यामुळे याची देखील चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, यामुळे एकामागून एक काँग्रेसला तीन झटके मिळण्याची चिन्हं नाकारता येत नाहीत. यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे आमदार कधी निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेकजण सध्या पक्षांतर करत आहेत.