उमेदवारी घोषित होताच गोल्डन आमदार रमेश वांजळेंच्या मुलाची मोठी घोषणा! सिंहगड किल्ल्यावर…

राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. असे असताना आता मनसेने आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये ४५ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये अनेक मोठी नावे समोर आली आहेत. खडकवासला मतदारसंघातून दिवंगत माजी आमदार रमेश वांजळे यांच्या मुलाला उमेदवारी देण्यात आली आहे.

यामुळे याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. याठिकाणी भाजपच्या पहिल्या यादीमध्ये विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांचे नाव आले नव्हते. तसेच मविआचे जागावाटप अद्यापही झाले नाही. असे असताना मनसेने मयुरेश वांजळे यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे.

याठिकाणी रमेश वांजळे यांनी मनसेमध्ये प्रवेश करत निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचे निधन झाले. राष्ट्रवादीच्या विकास दांगट आणि भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांची पराभव केला आहे. गोल्डन मॅन म्हणून रमेश वांजळे यांची राज्यभर ओळख होती. २०११ मध्ये निधन झाले होते. राज ठाकरे यांचे ते निकटवर्तीय आमदार होते.

नंतर पोटनिवडणुकीमध्ये भाजपच्या भीमराव तापकीर यांनी विजय मिळवला होता. सध्या ही जागा भाजपकडे आहे. २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून सचिन दोडके यांनी चांगली टक्कर दिली होती. थोड्या मताने त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. यामुळे आता काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या निवडणुकीमध्ये आता या मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. नक्कीच मतदारसंघात आमचा झेंडा फडकेल, असा विश्वास मयुरेश वांजळे यांनी व्यक्त केला. तसेच माझ्यावर विश्वास दाखवला त्याला तडा जावू देणार नाही, खडकवासल्याच्या सिंहगड किल्ल्यावर शिवमुद्रा फडकणार, असेही ते म्हणाले.

विजयाचा विश्वास आहे, महाराष्ट्रातील अखंड मनसैनिकांचे आराध्यदैवत राज ठाकरे यांचे आभार मानतो. मी ऑगस्टपासून तयारीला लागलो होतो, यामुळे ही जागा जिंकण्यासाठी प्रयत्न करणार आणि जिंकणारच असेही ते म्हणाले, अजून इतर पक्षांनी याठिकाणी उमेदवार घोषित केले नाहीत.