‘माझ्या आईची तब्येत खूप बिघडलीय, लवकर घरी या’; डॉक्टर घरी येताच तरुणीने कपडे काढले अन्…

बरेलीतील हनी ट्रॅप टोळीने सुभाष नगर पोलीस स्टेशन परिसरातील डॉक्टरला शिकार बनवले. तक्रारीनंतर काही दिवसांनी त्यांचा धक्का बसून मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिस एफआर (अंतिम अहवाल) दाखल करण्याच्या तयारीत होते. महिला आरोपी हिमानी शर्माला पोलिसांनी अटक करून तुरुंगात पाठवले आहे.

सुभाषनगर पोलिस निरीक्षक अखिलेश प्रधान यांनी सांगितले की, ही टोळी अनेक दिवसांपासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा गैरवापर करून अश्लील व्हिडिओ बनवून अधिकारी, कर्मचारी, लष्करी कर्मचारी आणि उच्चभ्रूंना ब्लॅकमेल करत होती.

अनेक लोकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्यात आली आहे. याच टोळीतील हिमानी शर्मा हिला सुभाष नगर जकात नाक्यावर वाहन तपासणीदरम्यान पकडण्यात आले. ती गुलदिया, ठाणे बिसौली, जिल्हा बदाऊन येथील रहिवासी आहे.

तरुणीकडून सातत्याने पैशांसाठी ब्लॅकमेल केले जात असल्याच्या धक्क्याने डॉक्टरचा मृत्यू झाला. या प्रकरणी 22 वर्षांच्या तरुणीला अटक केली आहे. याबाबत तपास सुरू आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी या डॉक्टरला एक फोन आला. फोन करणाऱ्या तरुणीने आपण नर्सिंगचा कोर्स केला असून तिला नोकरीची आहे असे त्या डॉक्टरला सांगितले.

डॉक्टरने सध्या जागा नसल्याचे तिला सांगत फोन कट केला. यामुळे ही तरुणी हॉस्पिटलमध्ये गेली आणि नोकरी मागितली. मात्र डॉक्टरने नकार दिला. आपण गरीब असून डॉक्टरला घरी येऊन तपासणी करण्याची विनंती त्या मुलीने रडत रडत केली.

शेवटी डॉक्टरने घरी येण्याचे मान्य केले. तो पत्त्यावर पोहोचला. पण घरी पोहोचताच मुलीने आपले सर्व कपडे उतरवले आणि डॉक्टरसोबत गैरवर्तन सुरु केलं. यामुळे डॉक्टरला काहीतरी वेगळं घडतंय याचा अंदाज आला.

घरात आधीच एक महिला आणि दोन पुरुष लपून बसले होते. या सर्वांनी डॉक्टरचे कपडे काढले. त्यानंतर डॉक्टरचे आणि त्या मुलीचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ शूट केले. याबाबत डॉक्टरच्या कुटुंबाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरु केल्यावर संपूर्ण प्रकरण बाहेर आलं.

हनी ट्रॅप टोळीने डेबिट कार्ड घेऊन डॉक्टरांकडून 50 हजार रुपये काढून घेतले होते. मधु नावाची महिला हनी ट्रॅप टोळीची प्रमुख आहे. या टोळीत प्रिया गंगवारसह अन्य दोघांचाही समावेश आहे. आरोपींनी तक्रार केल्यानंतर डॉक्टरचा धक्का बसून मृत्यू झाला.

एसएसपी प्रभाकर चौधरी म्हणाले की, हनी ट्रॅप टोळीवर कडक कारवाई केली जाईल. फिर्यादी व साक्षीदार नसतानाही पुराव्याच्या आधारे पोलीस आपल्या वतीने जास्तीत जास्त कारवाई करतील.