सध्या रस्ते अपघाताच्या अनेक धक्कादायक घटना घडत आहे. अनेकांना अपघातात आपला जीव गमवावा लागत आहे. अशीच एक घटना खासदार उदयनराजे भोसले यांच्या सहकाऱ्याच्या मुलीसोबत घडली आहे.
उदयनराजे यांच्या निकटवर्तीय सहकाऱ्याच्या मुलीचे अपघाती निधन झाले आहे. त्यामुळे सहकाऱ्यासोबतच उदयनराजे यांनाही याचा मोठा धक्का बसला आहे. याचसंदर्भात आता उदयनराजे यांनी एक फेसबूक पोस्ट केली आहे.
मित्राच्या मुलीच्या मृत्यूमुळे मनाला प्रचंड वेदना झाल्याचे उदयनराजे यांनी फेसबूक पोस्टमध्ये सांगितलं आहे. त्यांच्या कुटुंबाला दु:खातून सावरण्याचे बळ मिळो, अशी प्रार्थनाही उदयनराजे भोसले यांनी या पोस्टच्या माध्यमातून केली आहे.
उदयनराजे यांची फेसबूक पोस्ट-
आमचे निकटवर्तीय मित्र कै दीपक आहेरराव यांची सुकन्या कु. गायत्री दिपक आहेरराव हिचा काल दुर्देवी अपघातात मृत्यु झाला. हे समजल्यानंतर मनाला प्रचंड वेदना झाल्या.
भूतकाळातील अनेक घटना वेगाने तरळून गेल्या. श्री आहेरराव परिवाराशी आमचा अत्यंत घनिष्ट ऋणानुबंध आहे.
कै दीपक यांचेही काही वर्षांपूर्वी अपघाती निधन झाले होते आणि आज परत हा दुःखाचा डोंगर आहेरराव कुटुंबियांवर आला वहीनी श्रीमती ज्योती आहेरराव यांनी अतिशय कष्टांने व जिद्दीने सर्व अडचणींना सामोरे जाऊन मुलांची शिक्षण व सर्व गोष्टींची पूर्तता केली आज त्यांच्यासाठी काय भावना व्यक्त कराव्यात हेच समजत नाही आम्ही निशब्द आहोत.
नुकतीच नगरपरिषदेच्या सेवेत गायत्री रुजू झाली होती, याचे समाधान होते. परंतु हे समाधान अल्पकालावधीचे ठरले. तिच्या अचानक एक्झीटची सल मनात कायम टोचत राहील. आहेरराव कुटुंबाच्या दुखात आम्ही सहभागी आहोत. कुटुंबियांना व मित्रपरिवाराला या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
गायत्री च्या आत्म्यास चिरशांती लाभो 🙏🏻
भावपूर्ण श्रद्धांजली.