८ ते ३ शाळा, ४ ते ७ ट्युशन, रात्री होमवर्क; तणावामुळे ९ वीच्या मुलीचा शाळेतच हार्टॲटॅकने मृत्यू; बीडमधील घटना

बीडमधून एक भयानक घटना समोर आली आहे. शाळेत शिकणाऱ्या एका मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. त्यामुळे संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शाळा, ट्युशनच्या अभ्यासामुळे ती तणावात असल्याचेही म्हटले जात आहे.

मुलगी इयत्ता नववीमध्ये शिकत होती. शाळा आणि ट्युशनमुळे खुप ताण येत असल्याचे तिने आपल्या पालकांना सांगितले होते. त्यावर शाळा बदलण्याचा निर्णय पालकांनी घेतला होता. पण शाळा बदलण्याआधीच ही घटना घडली आहे.

रशमा शेख असे त्या मुलीचे नाव होते. ती एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत होती. शुक्रवारी ती शाळेत जाऊन पहिल्या बेंचवर बसली होती. त्यानंतर तिने अचाानक मान खाली टाकली. त्यामुळे तिला एका रुग्णालयात दाखल करण्यात आली.

डॉक्टरांनी तिला तपासले असता त्यांनी तिला मृत घोषित केले. गुरुवारी रात्री १ वाजेपर्यंत रशमा आपला होमवर्क करत होती. शाळा आणि ट्युशनमुळे आपल्याला ताण येत असल्याचे तिने आपल्या आईवडिलांनाही सांगितलेही होते.

शाळा लवकरच बदलण्याचा विचार तिचे घरचे करत होते. पण त्याचपूर्वी अशी घटना घडल्यामुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. रशमा ही खुप हुशार मुलगी होती. पण तवाणामुळे तिला आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे सगळीकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रशमाची शाळा सकाळी ८ वाजेपासून ३ वाजेपर्यंत असायची. तर दुपारी ४ ते ७ वाजपर्यंत ट्युशन असायची. त्यानंतर रात्री ती होमवर्क करायची. त्यामुळे तिला कोणत्याही गोष्टीसाठी वेळ मिळत नसायचा. त्यामुळे ती तणावात गेल्यामुळे अशी घटना घडली आहे.