‘ती’ एक चुक जीवावर बेतली, कुकरच्या स्फोटामुळे महिलेचा मृत्यू; तुम्ही पण आताच व्हा सावध

घरात स्वयंपाक करत असताना काळजी घेणे गरजेचे असते. कारण कोणतीही चुक झाली तर मोठा अनर्थ घडण्याची शक्यता असते. अशीच एक घटना जयपूरमधून समोर आली आहे. स्वयंपाक करत असताना महिलेने एक अशी चुक केली आहे, ज्यामुळे तिला तिचा जीव गमवावा लागला.

प्रेशर कुकरचा स्फोट झाल्यामुळे महिलेचा मृत्यू झाला आहे. कुकरचा स्फोट इतका भयानक झाला होता की त्याचा आवाज २०० ते ३०० मीटरपर्यंत ऐकू गेला होता. जयपूरच्या झोटवाडा भागात ही घटना घडली आहे.

४७ वर्षीय किरण कंवर या सोमवारी नेहमीप्रमाणे स्वयंपाक करत होत्या. त्यावेळी अचानक प्रेशर कुकरचा स्फोट झाला. या स्फोट इतका भयानक होता की कुकटरचे तुकडे किरण यांच्या शरीरामध्ये घुसले होते.

या भयानक घटनेमुळे त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्या अंगावर अनेक ठिकाणी जखमा झाल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्याला देखील दुखापत झाली होती. गंभीर जखमी झाल्यामुळे किरण यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यावेळी किरण घरात एकट्याच असल्यामुळे तातडीने त्यांना मदतही मिळू शकली नाही.

किरण यांचे पती राजकुमार सिंग हे शिक्षक आहे. त्यामुळे ते रोज लवकर घराबाहेर पडून शाळेत शिकवायला जातात. तसेच किरण यांना एक मुलगाही आहे, पण त्यावेळी तो घरात नव्हता. स्फोट झाला तेव्हा मोठा आवाज झाला. त्यामुळे सर्व शेजारी घराबाहेर आले होते.

किरण यांच्या घरातून हा आवाज आला हे शेजाऱ्यांना कळले होते, पण नक्की काय झाले हे कोणालाच कळत नव्हते. पण काही वेळ होऊनही किरण यांच्या घरातून कोणी बाहेर न आल्यामुळे शेजारी त्यांच्या घराकडे धावले. त्यांनी किरण यांना आवाज दिले, पण त्या बाहेर आल्या नाही. त्यामुळे एक महिला घरात गेली.

किरण या स्वयंपाक घरात पडलेल्या होत्या. त्यावेळी ज्या महिलेने त्यांना बघितले तेव्हा ती महिलाही घाबरली. त्यानंतर आणखी शेजारी घरात आले. त्यावेळी तातडीने पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. कुकरची शिट्टी खराब झाल्यामुळे हा स्फोट झाल्याचे समोर आले आहे.

कुकरची शिट्टी खराब झालेली होती. त्यामुळे हा स्फोट झाला आहे. ती जाम झाली होती. कुकरमध्ये वाफ तयार झाली होती, पण शिट्टी खराब असल्यामुळे ती वाजली नाही. त्यामुळे हे घडलं, असे फॉरेन्सिक अधिकारी अभय प्रताप सिंग यांनी म्हटले आहे.