राज्यातील ८० टक्के शिक्षक भ्रष्ट, त्यांचा पगार बंद करा, ते बिअर बार चालवतात; भाजप आमदाराची मागणी

भाजप आमदाराने राज्यातील शिक्षकांवर गंभीर आरोप केले आहे. त्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. राज्यातील ८० टक्के शिक्षण भ्रष्ट आहेत, त्यांचा पगार बंद केला पाहिजे, असे भाजप आमदार प्रशा्ंत बंब यांनी म्हटले आहे.

राज्यातील शिक्षकांची गुणवत्ता तपासणारी चाचणी नुकतीच घेण्यात आली होती. पंरतू या परिक्षेमध्ये मराठवाड्यातील ९० टक्के शिक्षण उपस्थित नव्हते. त्यावरुन प्रशांत बंब यांनी त्या शिक्षकांचा समाचार घेतला आहे.

राज्यामध्ये-देशामध्ये सरकार जास्तीत जास्त पैसे हे शिक्षकांवर खर्च करत असतात. मराठवाड्यात पाहिले तर ८० हजार शिक्षक मुलांना शाळेत शिकवत आहे. पण परीक्षा घ्यायचं ठरलं तर वेगळंच चित्र समोर आलं, असे प्रशांत बंब यांनी म्हटले आहे.

८० हजार शिक्षक आहेत, पण परीक्षा द्यायची म्हटलं तर फक्त २० हजार शिक्षकांनीच फॉर्म भरला. तसेच परीक्षा द्यायला सुद्धा २५०० शिक्षकच आले. बाकीचे नक्की गेले कुठे? तुम्हाला काही येत नाही, म्हणून परीक्षा देत नसाल तर अवघड आहे, असे म्हणत प्रशांत बंब यांनी सुनावले आहे.

सध्या सगळी शिक्षण व्यवस्थाच अशा शिक्षकांनी भरलेली असून ८० टक्के शिक्षक हे भ्रष्ट आहे. शिक्षकांबद्दल बोलताना वाईट वाटतं, पण शिक्षकांमुळेच आपल्या पिढ्या सुधारणार आहे. तेच मुलांवर चांगले संस्कार घडवत असतात, असेही प्रशांत बंब यांनी म्हटले आहे.

यावेळी प्रशांत बंब यांनी काही गंभीर आरोपही केले आहे. ते म्हणाले की, काही शिक्षकांनी तर आपल्या नातेवाईकांच्या नावाने बिअर बार चालवायचे काम सुरु केले आहे. असे घडत राहीले तर याचे मुलांवर काय संस्कार होईल. काही शिक्षक तर गावात न राहताही भाडेभत्ता घेत आहे. मी काही बोललो तर मला काही शिक्षकांनी धमक्या सुद्धा दिल्या होत्या. पण मी माझा आवाज असाच सुरु ठेवणार आहे.