---Advertisement---

कोकाटेंना शिक्षा दिली तर त्यांच्या मतदारसंघाची निवडणूक पुन्हा घ्यावी लागेल आणि जनतेचा पैसा खर्च होईल; न्यायालयाचं निरीक्षण

---Advertisement---

नाशिक: कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या दोन वर्षांच्या शिक्षेला नाशिक सत्र न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने या प्रकरणात काही महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली आहेत.

कोर्टाने स्पष्ट केले की, कोकाटे यांच्या अपात्रतेमुळे मतदारसंघात पुन्हा निवडणूक घ्यावी लागेल, ज्यामुळे जनतेच्या पैशाचा अनावश्यक खर्च होऊ शकतो. तसेच, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या प्रकरणाचा दाखला देत न्यायालयाने निर्णयाचा विचार केला आहे.

कोकाटे यांचा बचाव पक्षाचा युक्तिवाद
बचाव पक्षाने युक्तिवाद करताना सांगितले की, कोकाटे गेली ३५ वर्षे जनतेचा विश्वास संपादन करत निवडून आले आहेत. सध्या ते कॅबिनेट मंत्री म्हणून राज्यभर काम करत असून, शिक्षेला स्थगिती न मिळाल्यास जनसेवेची संधी गमावतील. अंतिम निकाल येईपर्यंत त्यांना काम करण्याची संधी द्यावी, असा युक्तिवाद करण्यात आला.

आर्थिक स्थितीबाबत न्यायालयाचे निरीक्षण
प्रकरणाशी संबंधित दाखले पाहता, कोकाटे यांनी १९८९ मध्ये शासनाच्या सदनिकेसाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने १९९२ नंतरचे उत्पन्न विचारात घेतले आहे. १९८९ मधील आर्थिक परिस्थिती कशी होती, हे सिद्ध करता आले नसल्याचेही न्यायालयाने नमूद केले.

सर्व बाजूंचा विचार करून नाशिक सत्र न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---