कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी त्यांच्या एनडी स्टुडीओमध्ये जीवन संपवले आहे. कर्ज आणि ज्या कंपनीकडून कर्ज घेतले होते, त्यांच्या मालकांच्या दवाबामुळे त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे.
नितीन देसाई यांच्यावर २५० कोटी रुपयांचे कर्ज होते. वाढते व्याज आणि स्टुडिओला न मिळणाऱ्या कामांमुळे ते खुप तणावात होते. तसेच कंपनीकडून नितीन देसाई यांच्यावर कर्ज फेडण्यासाठी दबाव टाकला जात होता.
आता नितीन देसाई प्रकरणी रायगड पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये एडलवाईज कंपनीचे सीईओ रसेश शाह, चेअरमन केयूर मेहता, स्मित शाह, ईआरसी कंपनीचे आर के बन्सल आणि जितेंद्र कोठारी यांच्यावर कलम ३०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जीवन संवपण्यापूर्वी नितीन देसाई यांनी काही व्हॉईस नोट्स रेकॉर्ड केल्या होत्या. त्यामध्ये त्यांनी आपल्याला कोण-कोण त्रास देत आहे याबाबत माहिती दिली होती. त्यांनी त्या व्हॉईस नोट्स वकील वृंदा यांना पाठवल्या होत्या.
रसेश शाह गोड बोलतात. पण त्यांनी माझ्या स्टुडिओवर कब्जा केला आहे. मी त्याला १०० वेळा फोन केला पण त्याने फोन उचलला नाही. त्या लोकांनी १३८, ईओडब्ल्यु, एनसीएलटी, डीआरचीच्या माध्यमातून मला त्रास दिला, असे नितीन देसाईंनी व्हाईस नोट्समध्ये म्हटले होते.
तसेच माझ्याकडे दोन-तीन गुंतवणूकदार होते. ते गुंतवणूक करण्यास तयार होते. पण त्या लोकांनी मदत केली नाही. त्यांनी माझ्यावर दुप्पट कर्ज लादलं. त्यांच्या स्वार्थासाठी ते माझ्यावर दबाव टाकत होते, असेही देसाईंनी म्हटले होते.
स्मित शाह केयूर मेहता, आर के बन्सल यांनी माझ्या स्टु़डिओवर कब्जा केला. त्यांनी मला पैशांसाठी धमकावलं. मला ऑफिस विकायला सांगितलं. ते एका मराठी कलाकाराला संपवण्याचा प्रयत्न करत होते. त्यांनीच मला हे करण्यास भाग पाडले आहे, असेही नितीन देसाई यांनी त्या व्हॉईस नोट्समध्ये म्हटले होते.