बोरिवलीच्या राजेंद्रनगरमधल्या भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पतीसमोरच त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. पण नवरा हातबल असल्यामुळे त्याला काहीच करता आले नाही. अखेर पोलिसांनी दरवाजा उघडून त्या महिलेला बाहेर काढले आहे.
संबंधित घटना ही राजेंद्रनगरमधल्या भूमी गार्डन इमारतीमध्ये घडली आहे. भास्कर शेट्टी आणि सुलोचना शेट्टी (वय ७८) असे त्या दाम्पत्याचे नाव होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते या इमारतीमध्ये राहत होते. त्यांची लेक आणि जावई हे अमेरिकेत काम करतात.
आईवडिलांची काळजी घेण्यासाठी त्यांनी केअर टेकर ठेवला होता. पण तो व्यवस्थित काम करत नसल्यामुळे त्याला काढून टाकण्यात आला होते. अशात घरातलं काम करुन सुलोचना या आजारी पडल्या होत्या.
त्या काही दिवस अंथरुनाला धरुनच होत्या. पावसामुळे त्या बाहेर येत नसाव्या असे शेजाऱ्यांना वाटत होते. पण दोन तीन दिवसांपासून शेट्टी यांच्या फ्लॅटमधून उग्र वास येत होता. त्यामुळे शेजाऱ्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी तातडीने सुलोचना यांचे घर गाठले. त्यांनी बेल वाजवली, पण कोणीही दार उघडत नव्हतं. त्यामुळे अखेर पोलिसांनी ते दार तोडलं. तेव्हा आत त्यांनी बघितलं तर त्यांना धक्काच बसला. भास्कर शेट्टी पडलेले होते. तर त्यांच्या शेजारीच त्यांच्या पत्नीचा मृतदेह होता.
भास्कर जाधवांच्या पत्नी सुलोचना यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. भास्कर जाधव हे समोरच होते. पण हलता येत नसल्यामुळे त्यांना काहीच करता आले नाही. सुलोचना यांच्या जाण्यामुळे शेजारी राहणाऱ्या महिलांचे अश्रूही अनावर झाले होते. सुलोचना या त्यांच्या पतीची खुप काळजी घेत होत्या.
दरम्यान, पोलिस एकटे राहणाऱ्या वृद्धांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेत असतात. तसेच कोणता त्रास तर नाहीये ना याची चौकशी करत असतात. गेल्या आठवड्यात कस्तुरबा पोलिस ठाण्याचे कर्मचारी त्यांच्या घरी आले होते. त्यावेळी त्यांची प्रकृती व्यवस्थित होती. पण शुक्रवारी अचानक ही घटना समोर आली आहे.