सचिनही पडला ‘बाईपण भारी देवा‘च्या प्रेमात; दीपा चौधरीला व्हिडिओ कॉल लावला अन् म्हणाला…

मराठी चित्रपट चालत नाही, असे अनेकांचे म्हणणे होते. पण बाईपण भारी देवा या चित्रपटाने सगळ्यांचे गैरसमज दुर केले आहे. केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ पैसा कमवतो आहे. महिला वर्ग मोठ्या प्रमाणात हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये जात आहे.

रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी यांनी चित्रपटात प्रमुख भुमिका निभावल्या आहे. त्यांच्या अभिनयाचे जोरदार कौतूक केले जात आहे. अशात हा चित्रपट क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडूलकरने सुद्धा बघितला आहे.

सचिन तेंडूलकरही या चित्रपटाच्या प्रेमात पडला आहे. सचिनसाठी खास या शोचे आयोजन करण्यात आले होते. हा चित्रपट पाहण्यासाठी सचिन तेंडूलकरसोबत राज ठाकरे, चित्रपटाचे निर्माते अजित भुरे, केदार शिंदे आणि इतर कलाकारही उपस्थित होते.

अशात चित्रपट संपल्यानंतर कोणीतरी दीपा चौधरीला व्हिडिओ कॉल लावला होता. तेव्हा सचिनने थेट दीपा चौधरीशी संवाद साधला होता. त्यावेळी त्याने दीपा चौधरी यांचे खुप कौतूक केले आहे. बाईपण भारी देवा हा चित्रपट खुप भारी आहे, असे सचिनने म्हटले आहे. दीपा यांनी देखील सचिन तेंडूलकरचे आभार मानले आहे.

दोघांचा हा व्हिडिओ कॉल सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. दीपा चौधरीने सुद्धा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत दीपा चौधरीने एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये तिने सचिनसोबतचा हा व्हिडिओ कॉल म्हणजे अविस्मरणीय क्षण असल्याचे म्हटले आहे.

दीपा चौधरीची पोस्ट-
THE DREAM COME TRUE MOMENT
सचिन… द सचिन तेंडुलकर… लाखो-करोडो चाहते आहेत त्यांचे, मी देखील त्यांच्यापैकीच एक. त्यांची भेट होणं… ही माझ्यासाठी खरंच एक फॅन मोमेंट आहे. ‘बाई पण भारी देवा’ चित्रपटाने खरंच आम्हाला भरपूर काही दिलंय पण सचिन तेंडुलकर येऊन चित्रपट बघतील….. त्यांना तो आवडेल आणि त्याचं ते इतकं कौतुक देखील करतील याचा आम्ही कोणीही स्वप्नांत देखील विचार नव्हता केला. पण… YES…It’s Fact… शब्दांत न मांडता येणारा पण आयुष्यभरासाठी मनावर कोरला गेलेला हा एक क्षण.

मालिकेच्या शूटिंग मध्ये व्यस्त असल्यामुळे मला प्रत्यक्ष स्क्रीनिंगला जाता आले नाही. ज्या व्यक्तीला आयुष्यात एकदा तरी भेटायची इच्छा होती त्याला भेटण्याची संधी समोरून चालून आलेली असता मी त्या संधीला मुकले असं वाटत असतानाच मला व्हिडीओ कॉल येतो… आणि प्रत्यक्ष सचिन तेंडुलकर यांच्याशी संवाद साधला जातो… आम्हा सर्व जणींचा अभिनय, चित्रपट त्यांना आवडला हे ऐकून खूप छान वाटलं… अजूनही हे सर्व काही स्वप्नवतचं आहे. THANK YOU निखिल साने आणि अजित भुरे आयुष्यभर लक्षात राहणाऱ्या ह्या एका अविस्मरणीय फोन साठी.