पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २४ वर्षीय तरुणीने कालव्यामध्ये उडी घेऊन आपले जीवन संपवले आहे. सोनाली ज्ञानेश्वर गायकवाड असे त्या तरुणीचे नाव आहे. खेड तालुक्यात ही घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील चासकमान कालव्याच्या पाण्यात उडी मारुन त्या तरुणीने जीवन संपवले आहे. याबाबत मुलीच्या वडिलांनीच खेड पोलिस ठाण्यात जाऊन या घटनेची फिर्याद दिली आहे.
सोनाली ४ जुलैला सकाळी ६ वाजेच्या सुमारास घरातून बाहेर पडली होती. राजगुरुनगर येथील राजगुरु महाविद्यालयात कार्यक्रम असल्याचे तिने सांगितले होते. पण खुप वेळ झाल्यानंतरही ती घरी आली नाही. त्यामुळे कुटुंबाने तिचा शोध सुरु केला.
अशात चाकसमान कालव्याच्या मागील बाजूस तिचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर कुटुंबाने पोलिस ठाण्यात जाऊन याबाबत माहिती दिली आहे. आता पोलिसांच्या मदतीने तो मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.
सोनालीच्या जाण्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. सोनाली खुप हुशार होती. ती महाविद्यालयात शिकत होती. पण अचानक असे झाल्यामुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. सोनाली असे काही करेल असे कोणालाही वाटले नव्हते.
पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाली असून पोलिस याप्रकरणाचा तपास करत आहे. सोनालीच्या मृत्यूचे कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे सोनालीने आपले जीवन का संपवले? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.