प्रेमासाठी काय पण म्हणत अनेकजण आपल्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न करत असतात. पण त्या लग्नानंतरही अनेकदा वाद होताना दिसतात. अशीच एक घटना नागपूरमधून समोर आली आहे. प्रेमविवाह होऊनही पतीशी भांडणं होत असल्यामुळे एका तरुणीने टोकाचे पाऊल उचलले आहे.
नागपूर शहरातील अजनी पोलिस ठाण्यात संबंधित घटना घडली आहे. एका २२ वर्षीय तरुणीचा प्रेमविवाह झाला होता. तीन वर्षांपूर्वी तिने कुटुंबाच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला होता. पण त्याच तरुणीने जीवन संपवले आहे.
सिमरन महाकाळे असे त्या तरुणीचे नाव आहे. शहरामधील एका खाजगी रुग्णालयामध्ये ती नर्स म्हणून काम करत होती. प्रेमविवाह यशस्वी न झाल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे. तिने अक्षय नाकोसे नावाच्या तरुणाशी प्रेमविवाह केला होता.
सिमरन ही बेसा येथील एका पॅथॉलॉजी लॅबमध्ये काम करत होती. काम करत असताना तिची ओळख अक्षय नाकोसे या तरुणाशी झाली होती. सुरुवातीला दोघांची मैत्री झाली होती. पण त्या मैत्रीचं रुपांतर नंतर प्रेमात झालं.
प्रेमात असताना त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. या लग्नाला दोघांच्या कुटुंबाचा विरोध होता. पण त्यांनी कुटुंबांच्या विरोधात जाऊन लग्न केले. लग्नानंतर तिने नर्सिंगच्या एका कोर्सला प्रवेश घेतला होता.
अशात अक्षयला तिच्यावर संशय येऊ लागला होता. त्या संशयामुळे अक्षय तिला मारहाण करत होता. त्यामुळे तिने आईकडे याबाबत तक्रार केली होती. तसेच ती आईकडे राहायला गेली होती. ती खुप तणावात गेली होती. अशात प्रेमविवाह यशस्वी न झाल्यामुळे तिने थेट आपले जीवन संपवण्याचाच निर्णय घेतला आहे.