गेल्या एका वर्षात राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या आहे. आधी एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे शिवसेनेत मोठी फुट पडली. त्यानंतर अजित पवारांनी बंड केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फुट पडली आहे.
अशात महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक मोठा भुकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेत मोठी फुट पडणार असणार असल्याचे म्हटले जात आहे. रविकांत तुपकर आणि राजू शेट्टी यांच्यात मतभेद झाल्याचे म्हटले जात आहे.
दोघांमध्ये मतभेद झाल्यामुळे आता रविकांत तुपकर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. ते त्यांचा एक वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत आहे. पुण्यात मंगळवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीला रविकांत तुपकर उपस्थित नव्हते.
संघटनेने मंगळवारी संघटनेच्या शिस्तपालन आणि कोअर कमिटीची बैठक बोलावली होती. कारण रविकांत तुपकर यांनी राजू शेट्टी यांच्या संघटना चालवण्याच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केले होते. या बैठकीत त्यांच्याशी चर्चा केली जाणार होती. पण तेच या बैठकीला उपस्थित नव्हते.
रविकांत तुपकर हे उपस्थित न राहिल्यामुळे फुट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. १५ ऑगस्टला संघटनेची एक बैठक होणार आहे. त्या बैठकीलाही तुपकर आले नाही, तर पाच लोकांची समिती मिळून त्यांच्या संदर्भात निर्णय घेईन, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.
रविकांत तुपकर यांचा रोख माझ्यावर आहे हे स्पष्ट आहे. त्यामुळे या निर्णय प्रक्रियेत मी सहभागी होणार नाही, असेही राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. त्यावर बोलताना रविकांत तुपकर म्हणाले आहेत की, तुपकर गेलेले नाही. संघटनेच्या हितासाठी ते नाराज आहेत.
रविकांत तुपकर यांनी तातडीने कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. त्यामध्ये त्यांनी संघटनेतील मतभेद सांगितले होते. त्यांनी राजू शेट्टींच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले होते. सदाभाऊ खोत आणि आपण संघटना वाढवली, पण आपल्यालाच संपवण्याच काम केलं जातंय, असे रविकांत तुपकर यांनी म्हटले आहे.