जालन्यात एसटीचा भीषण अपघात! ४२ प्रवाशांसह बस थेट ५० फुट खोल खड्ड्यात; ड्रायव्हरची ‘ही’ चूक नडली

काही दिवसांपासून रस्ते अपघाताच्या अनेक धक्कादायक घटना घडत आहे. अशीच एक घटना आता जालन्यातून समोर आली आहे. पुसरवरुन मुंबईकडे येणाऱ्या एक बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बस थेट ५० फुट खोली खड्ड्यात पडली आहे.

एसटी महामंडळाच्या बसचा हा अपघात झाला आहे. या बसमध्ये एकूण ४२ प्रवासी होती. त्यातील अनेक प्रवासी हे जखमी झाले आहे. संबंधित घटना ही मंंठा ते वाटरच्या दरम्यान घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि बचाव पथक तिथे तातडीने गेले होते.

५० फुट खोल खड्ड्यात ही बस कोसळली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला आहे. या अपघातात काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. हा अपघात झाल्यानंतर स्थानिक नागरिक तातडीने मदतीसाठी धावून गेले होते.

मंठा शहराच्या पुढे किलडी फाटा आहे. तिथे एक पुल आहे. या पुलाचं काम सुरु असल्यामुळे तिथे एक मोठा ट्रक उभा होता. त्या ट्रकला ओव्हरटेक करत असताना हा अपघात झाला आहे, अशी माहिती बसच्या कंडक्टरने दिली आहे.

या बसमध्ये काही जेष्ठ नागरिक सुद्धा बसलेले होते. त्यामुळे त्यांनाही दुखापत झाली आहे. पण या अपघातात नक्की किती लोक जखमी झाले आहे, याबाबतचा आकडा समोर आलेला नाही. सध्या त्यांच्यावर जवळच्याच एका रुग्णालयात उपचार सुरु आहे.

अपघात झाल्यानंतर तातडीने तेथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तसेच त्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. तसेच पोलिस आणि बचाव पथकालाही याबाबत माहिती देण्यात आली होती. त्यानंतर त्यांनीही घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्याला सुरुवात केली होती. जे अपघातात जखमी झाले होते, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.