काही दिवसांपूर्वी हरिशचंद्र गडावर सहाजण फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्यापैकी एका तरुणाचा मृत्यू झाला होता. धुक्यांमुळे वाट चुकली, वारा पाऊस सहन न झाल्यामुळे एका तरुणाचा मृत्यू झाला होता.
पर्यटकाचा थंडी वाजून मृत्यू झाल्याचे म्हटले जात होते. आता दोन दिवसांनंतर यामागचे सत्य समोर आले आहे. त्याचा मृत्यू नक्की कसा झाला हे आता समोर आले आहे. अनिल गिते असे त्या तरुणाचे नाव होते.
पण आता चार दिवसांनी त्याच्या मृत्यूचं खरं कारण स्पष्ट झालं आहे. शवविच्छेदन अहवालात थंडीत कुडकुडून अनिल गीते यांचे शरीर कडक झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याने डॉक्टरांनी सांगीतले आहे.
अनिल गिते, अनिल आंबेकर, गोविंद आंबेकर, तुकाराम तिपाले, महादू भुतेकर आणि लहान हरिओम बोरुडे असे हे सहा जण होते. १ ऑगस्टला ते सर्वजण हरिशचंद्र गडावर ट्रेगिंकसाठी निघाले होते. हे सर्व गडाच्या मध्याला पोहचले होते.
मोबाईलमध्ये फोटो काढत ते पुढे निघाले होते. अशात अचानक गडावर धुके वाढले होते. त्यामुळे समोरचा व्यक्ती सुद्धा दिसत नव्हता. अशात त्यांना जंगलात वाटही मिळत नव्हती. त्यांनी ट्रेकला सुरुवातही दुपारी ४ ते ५ च्या सुमारास केली होती.
रात्री अंधार झाल्यामुळे त्यांनी एका कपारीचा आसरा घेतला आणि तिथेच रात्र काढली. सकाळ झाल्यानंतर त्यांनी पुन्हा रस्ता शोधायला सुरुवात केली. अशात अनिल गितेला खुप थंडी वाजू लागली. त्यामुळे त्याचे शरीरही कडक झाले होते
मोबाईलला रेंज नसल्यामुळे त्यांना कोणाला संपर्कही साधता येत नव्हता. त्यामुळे रस्ता शोधण्याच्या नादात ते आणखीनच भटकत गेले. अशात अनिल गितेची प्रकृती खुप बिघडली आणि त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांना काहीच सुचेनासे झाले होते. पण ते त्याला खांद्यावर घेऊन चालत होते. आळीपाळीने ते अनिल गितेला खांद्यावर घेत होते.
अशात एका गाईडला त्यांच्याबद्दल कळाले. त्याने त्यांचा शोध घेतला आणि त्यांना गडावर पोहचवले. तिथून तातडीने बचाव पथकाला याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर त्यांनी या सहाजणांना खाली आणले. त्यामध्ये दोन तीन जणांना थंडीचा प्रचंड त्रास झाल्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. तर अनिल गितेचा मात्र यामध्ये मृत्यू झाला आहे.