शिवरायांचा राज्यभिषेक कुठे झाला? Msc B.ed शिक्षिकेची बोलती बंद, उत्तरच देता आले नाही

प्रश्नांची उत्तरे द्या आणि बक्षीसे मिळवा, असे अनेक ठिकाणी पाहायला मिळते. टीव्हीवरही अनेक शो असे लागत असतात. त्या प्रश्नाचे बरोबर उत्तर देणाऱ्याला पैसेही मिळतात. असाच एक शो म्हणजे कौन बनेगा करोडपती. तसाच शो मराठीत सुद्धा आला आहे. कोण होणार करोडपती असे या शोचे नाव आहे.

या शोचे प्रेक्षकांना प्रचंड आकर्षण असते. कारण तुम्हाला किती ज्ञान आहे हे या शोवरुन कळत असते. या शोचे सुत्रसंचालन सचिन खेडेकर करत आहे. या शोवर जाऊन अनेकजण हॉट सीटवर बसत लाखो रुपयांची कमाई करत आहे.

अशात अनेक प्रश्न असेही असतात की ते खुप सोपे असतात पण गोंधळ्यामुळे आणि दडपणामुळे त्याचे चुकीचे उत्तर दिले जाते. सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या शोमध्ये एका शिक्षिकेला बरोबर उत्तर देता न आल्यामुळे तिला ट्रोल करण्यात येत आहे.

शोमध्ये ती खेळत असताना त्या शिक्षिकेला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला होता. पण या प्रश्नाचं उत्तर तिला देता आले नाही. त्यामुळे तिने लाईफ लाईन वापरली होती. शिक्षिका असूनही हे उत्तर न आल्यामुळे तिला ट्रोल करण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक सोहळा कोणत्या गडावर झाला होता? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्याला ओप्शन म्हणून प्रतापगड, शिवनेरी, सिंहगड आणि रायगड असे ऑप्शन देण्यात आले होते. पण त्या शिक्षिकेला या प्रश्नाचं उत्तरच सुचत नव्हतं.

त्यामुळे त्या शिक्षिकेने फोन अ फ्रेंड ही लाईफ लाईन वापरली. त्यानंतर तिने या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. विशेष म्हणजे ती शिक्षिता एमएससी बीएड झालेली होती. पण महाराजांविषयीचा हा सोपा प्रश्न न आल्यामुळे लोकांनी तिला ट्रोल केले आहे. हे काय विद्यार्थ्यांना घडवणार, यांना राज्यभिषेक कुठे झाला हे माहिती नाही, असे म्हणत लोकांनी ट्रोल केले आहे.

या प्रश्नाचे उत्तर रायगड असे आहे. १६५६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेतला होता. महाराजांनी याच किल्ल्यावर स्वराज्य स्थापनेचं स्वप्न पाहिलं होतं. त्यामुळे महाराजांचा राज्यभिषेक याच ठिकाणी करण्यात आला होता.