बुलढाण्यातील बस अपघाताची हादरवून टाकणारी माहिती आली समोर; ड्रायव्हर त्यादिवशी…

गेल्या काही महिन्यांपासून समृद्धी महामार्ग चर्चेचा विषय ठरला आहे. या महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात याच महामार्गावर एका बसचा भीषण अपघात झाला होता. त्यामध्ये २५ जणांचा मृत्यू झाला होता.

बुलढाण्यात झालेला या भीषण अपघाताने संपुर्ण महाराष्ट्रालाच हादरवले होते. या अपघाताबाबत अनेकजण संशय व्यक्त करत होते. त्यामुळे या अपघाताची तपासणी सुरु आहे. या अपघाताचा तपास करत असताना अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहे.

आताही अशीच एक बाब अपघाताबाबतची समोर आली आहे. या बसच्या अपघाताच्या तपासात बस ड्रायव्हर हा दारुच्या नशेत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. १ जूलैला हा अपघात झाला होता.

अपघातानंतर ड्रायव्हर आणि काही लोक या अपघातातून वाचले होते. त्यामुळे अनेकांनी या अपघाताबाबत संशय व्यक्त केला होता. त्यामुळे या अपघाताचा तपास केला जात होता. तसेच याप्रकरणी ड्रायव्हरच्या रक्ताचे नमुनेही घेण्यात आले होते.

आता त्या रक्त्याच्या नमुन्याचा अहवाल समोर आला आहे. त्यामध्ये ड्रायव्हर त्या रात्री दारुच्या नशेत होता अशी माहिती समोर आली आहे. या अहवालामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता पोलिस ड्रायव्हरवर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

ही बस ८० किलोमीटर प्रतितासाने ड्रायव्हर चालवत होता. त्यानंतर ती बस साईन बोर्डला धडकली आणि त्यानंतर ती थेट दुभाजकाला धडकली. त्यामुळे बस उलटी झाली होती. ज्याबाजूला दरवाजा होता त्याच बाजूला बस उलटली होती. तसेच डिझेल टँक फुटल्यामुळे बसला आगही लागली होती. या भीषण अपघातात २५ लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.