गेल्या काही महिन्यांपासून महिला अत्याचाराच्या अनेक धक्कादायक घटना समोर येत आहे. असे असतानाच आता नागपूरमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका मैत्रिणीच्या घरी आलेल्या तरुणीवर मैत्रिणीच्या काकानेच अत्याचार केल्याची घटना घडली आहे.
नागपूर जिल्ह्यातील रामटेकमध्ये ही घटना घडली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे ती तरुणी गरोदर राहिली असून तिने बाळालाही जन्म दिला आहे. त्यानंतर तरुणीने रामटेक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनीही याप्रकरणी काकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दिनेश आहाके असे त्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर त्याला अटक करण्यासाठी त्याचे घर गाठले होते. पण तो फरार झाला असल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार तरुणी ही २० वर्षांची आहे. तुमसर तहसीलची असलेली तरुणी ग्रॅज्युएशनसाठी नागपूरात आली होती. तिची कॉलेजमध्ये एका मुलीशी मैत्री झाली होती. त्या खुप खास मैत्रिणी झाल्या होत्या.
अशात नोव्हेंबर २०२२ मध्ये मैत्रिणीने तरुणीला घरी पाहूणा म्हणून बोलावले होते. तसेच घरी तिच्या राहण्याची आणि जेवणाचीही व्यवस्था केली होती. तरुणी घरी आली असता मैत्रिणीच्या विवाहीत काकांची नजर तिच्यावर पडली.
पाहुणा म्हणून ती काही दिवसांसाठी तिथे राहणार होती. अशात तो काका तिच्यासोबत अश्लील कृत्य करायचा. पण आपल्या मैत्रिणीचे काका असल्यामुळे तरुणी गप्प होती. एकेरात्री तो तिच्या रुममध्ये आला. त्याने तिच्याशी संबंधांची मागणी केली. पण तिने नकार दिल्यावर त्याने तिच्यावर अत्याचार केले.
ती तरुणी आठवडाभर मैत्रिणीच्या घरी होती. त्यावेळेत अनेकवेळा त्याने तिच्यावर अत्याचार केले. जेव्हा ती घरी परतली तेव्हा आपण गर्भवती असल्याचे तिला कळले. बदनामीच्या भितीने तिने कोणालाच याबाबत सांगितले नाही. पण ५ महिन्यानंतर तिच्या आईला आणि बहिणीला ही गोष्ट कळली. त्यामुळे तिला मावशीच्या घरी पाठवण्यात आले.
तरुणीच्या कुटुंबाला हे मुलं नको होते. पण तिने या मुलाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तिने बाळाला जन्मही दिला. पण दिनेशने बाळाला आपले नाव देण्यास नकार दिला. त्यामुळे त्या तरुणीने पोलिस ठाण्यात धाव घेतली. आता पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन घेतला असून आरोपीचा ते शोध घेत आहे.