अभिनेत्री जेनिलिया सोशल मीडियावर खुप सक्रीय असते. पती रितेश देशमुखसोबत अनेकदा ती वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करताना दिसत असते. त्यामुळे ती चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात असते.
मराठमोळ्या रितेश देशमुखमुळे जेनिलिया मराठी प्रेक्षकांसाठीही खास बनली. तिने अनेक गोष्टींमुळे मराठी प्रेक्षकांची मनेही जिंकली आहे. सोशल मीडियावरही रितेश आणि जेनिलियाची जोडी खुप प्रसिद्ध आहे.
अशात १४ ऑगस्ट २०१२ रोजी रितेशचे वडिल आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे निधन झाले होते. त्यामुळे १४ ऑगस्टला त्यांची पुण्यतिथी पार पडली होती. त्यादिवशी जेनिलियाने एक खास पोस्ट केली आहे. जी सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे.
जेनिलिया आणि विलासराव देशमुख यांचंही नातं खुप खास होतं. जेनेलिया विलासराव देशमुखांना सासरे नाही तर वडीलच मानत होती. अनेकदा मुलाखतीत ती विलासराव देशमुखांबद्दल बोलतानाही दिसून आली आहे.
लग्न झाल्यानंतर ती देशमुख कुटुंबाची सुन झाली होती. त्यावेळी ती विलासराव देशमुखांची मुलगीही झाली होती. पण अशात विलासराव देशमुखांचे निधन झाल्यामुळे जेनिलियालाही मोठा धक्का बसला होता. आता पोस्टच्या माध्यमातून तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.
जेनेलियाने विलासराव देशमुखांसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये ती म्हणाली की, प्रिय बाबा, मला तुम्हाला फक्त हे सांगायचंय की तुम्ही खुप चांगले आहात. तुमचा विचार करायला आम्हाला आवडतं, पण तुमच्याशिवाय आयुष्य जगणं खुप कठीण आहे.
तसेच पुढे जेनिलिया म्हणाली की, तुम्ही जिथे कुठे असाल ती जागा नक्कीच खुप खास असेल. कारण तुमच्यात ती ताकद आहे की तुम्ही दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरही हास्य निर्माण करु शकतात. तोपर्यंत आम्हाला तुमची खुप आठवण येत राहीन जोपर्यंत आम्ही तुम्हाला भेटत नाही.
जेनिलियाची ही पोस्ट खुप व्हायरल झाली आहे. पोस्ट पाहून तिचे चाहतेही भावूक झाले. तुम्हाला असे पाहून आमच्या डोळ्यात पाणी येतंंय, असेही एकाने कमेंट करत म्हटले आहे. एका मुलीसाठी तिचे वडील हे नेहमीच खास असतात, असेही एकाने लिहिले आहे.