काकाने मुलाच्या मांडीवर दिला टेडी बिअर, पोलिसांना संशय आला अन् फाडून बघितला तर…

बिहारमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. संपुर्ण राज्यात दारुबंदी असताना एका माणसाने आपल्या अल्पवयीन पुतण्याच्या मदतीने दारुची तस्करी करण्याचा प्रयत्न केला आहे. पण अधिकाऱ्यांच्या हुशारीमुळे ही गोष्ट समोर आली आहे.

दारु तस्करीसाठी काही लोक वेगवेगळे पर्याय वापरताना दिसत आहे. काही लोक हे वाहनांच्या छतामध्ये दारु लपवून आणताना दिसत आहे. तर काही लोक गाडीत वेगळे खप्पे करुन दारु लपवून आणताना दिसत आहे.

अशात एका व्यक्तीने दारुच्या तस्करीसाठी आपल्या पुतण्याचाच वापर केला आहे. उत्तर प्रदेशच्या सीमेवर मांझी जिल्ह्यातील उत्पादक शुल्क चेकपोस्टवर एका व्यवसायिकाच्या वाहनाची तपासणी केली जात होती.

अधिकारी आणि पोलिस तपास करत असताना गाडीत असलेल्या ७-८ वर्षाच्या मुलाच्या मांडीवर एक टेडी बेअर दिसून आला. त्यावेळी अधिकाऱ्याने तो टेडी हातात घेतला. बाकीच्या टेडींपेक्षा या टेडीचे वजन जास्त वाटत होते.

त्यावेळी हँडहेल्ड स्कॅनरने अधिकाऱ्याने टेडी बेअरची तपासणी केली. त्याच्यामध्ये काहीतरी आक्षेपार्ह वस्तु असल्याचे त्यांच्या लक्षात आले. जेव्हा त्या टेडीला फाडले. तेव्हा त्यामध्ये विदेशी दारुच्या काही बॉटल्स त्यांना दिसून आल्या.

दारु तस्करी करणाऱ्या व्यक्तीने टेडी बेअर आपल्याच पुतण्याच्या मांडीवर दिलं होतं. कोणालाही शंका येऊ नये म्हणून त्याने असे केले होते. पण स्कॅनरमुळे त्यात बॉटल असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर पोलिसांनी त्या व्यवसायिकाला ताब्यात घेतले आहे.

व्यवसायिकाला स्कॅनरने गाडी तपासली जाईल हे माहिती होते. त्यामुळे त्याने टेडी बेअरमध्ये दारु लपवली होती. अशात चेकपोस्टवर गाडीतून त्यांना उतरवण्यात आले. त्यावेळी मुलाला तो टेडी घेऊन खाली उतरता येत नव्हते. त्यावेळी अधिकाऱ्याने तो टेडी हातात घेतला. तो त्यांना जड वाटला. त्यामुळे त्यांनी तपासणी केली असता या सर्व गोष्टी समोर आल्या आहेत.