प्रसिद्ध डाॅक्टरने पुलावर गाडी थांबवली, शुज काढले अन् मारली नदीत उडी; नंतर घडलं असं की वाचून धडकी भरेल

सध्या अनेकजण तणावातून आपले जीवन संपवत असल्याच्या घटना घडत आहे. अशीच एक घटना आता जळगावमधून समोर आली आहे. चोपडा तालुक्यातील निमगव्हान येथील एका डॉक्टरानेच असे टोकाचे पाऊल उचलले आहे.

१५ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. व्ही आर पाटील असे त्या डॉक्टरांचे नाव आहे. ते ७५ वर्षांचे होते. त्यांनी तापी नदीच्या पुलावरुन नदीत उडी मारत जीवन संपवले आहे.

व्ही आर पाटील हे पाळधी येथील रहिवासी होते. ते १५ ऑगस्टच्या सकाळी तापी नदीजवळच्या पुलावर गेले होते. याठिकाणी त्यांनी आपली कार उभी केली होती. त्यानंतर त्यांनी आपल्या पायातील शुज काढले आणि पुलावरुन नदी पात्रात उडी घेतली.

यावेळी तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी ते बघितले. त्यांनी लगेचच पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर नदीपात्रातून त्यांचा मृतदेह काढण्यात आला.

व्ही आर पाटील यांच्या मागे पत्नी, मुलगा, सुन आणि नातवंडे असा त्यांचा परिवार आहे. व्ही आर पाटील हे पाळधीचे प्रसिद्ध डॉक्टर आहेत. पाळधीच्या मेनरोडवर त्यांचे कस्तुरबा नावाचे रुग्णालय आहे. त्यांच्या अशा निर्णयामुळे त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. पण त्यांनी असे का केले याबाबत अजूनही माहिती समोर आलेली नाही.

व्ही आर पाटील यांच्या निधनामुळे त्यांच्या निवासस्थानी मोठी गर्दी जमली आहे. त्यांनी आपल्या आयुष्यात समाजासाठी मोठी कामे केली होती. त्यांनी श्रीराम जेष्ठ नागरिक मंडळाची स्थापना केली होती. तसेच ते पुरोगामी चळवळीचे पुरस्कर्तेही होते.