गश्मीर महाजनीचा आईबाबत मोठा खुलासा; म्हणाला, आई रुग्णालयात दाखल होती, त्यामुळे…

काही आठवड्यांपूर्वी प्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचे निधन झाले होते. ते त्यांच्या आयुष्यातील शेवटच्या काही महिन्यांमध्ये एकटेच राहत होते. एका फ्लॅटमध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या निधनामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली होती.

रवींद्र महाजनी यांच्या मृत्यूमुळे त्यांचा मुलगा गश्मीर महाजनीला टीकेचा सामना करावा लागला होता. गश्मीरने काळजी घेतली नाही. त्यामुळे असे झाले असे म्हणत लोक त्याच्यावर टीका करत होते. पण तो आता सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका करणाऱ्यांना उत्तरं देत आहे.

काही दिवसांपूर्वीच गश्मीरची पत्नी गौरीने सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. त्यामध्ये तिने टीका करणाऱ्यांना उत्तर दिले होते. टोमण्यांच्या भट्टीमध्ये तापलेला माणूस राख नाही तर सोनं बनतो. गश्मीर माझा पती असल्याचा मला कायमच गर्व असेल असे तिने म्हटले होते.

आता गश्मीर महाजनीने त्याच्या आईबाबत माहिती दिली आहे. वडिलांच्या निधनामुळे गश्मीर महाजनी सोशल मीडियापासून दुर होता. तो पोस्टही करत नव्हता. पण आता तो सोशल मीडिया वापरताना दिसत आहे. तसेच त्याच्यावर टीका करणाऱ्यांनाही तो उत्तर देताना दिसत आहे.

तुझी आई ठिक आहे का? असा प्रश्न एका चाहत्याने विचारला होता. त्यावर तो म्हणाला की, तिला रुग्णालयातून सोडण्यात आलं आहे. आता ती ठीक आहे. तसेच एका चाहत्याने विचारलं होतं की तुझं काम कसं सुरु आहे. त्यावर बोलताना तो म्हणाला की, प्रोजक्ट्स आहेत, पण आई पडल्यानंतर मी तिची काळजी घेत होतो. आता ती ठिक आहे. त्यामुळे मी लवकरच कामाला सुरुवात करेन. तसेच ट्रोलर्सवर बोलताना तो म्हणाला की, मी त्यांच्याकडे जास्त लक्ष देत नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, गश्मीरची आई पडली होती. त्यामुळे त्यांची काळजी घेण्यात तो व्यस्त होता. तसेच वडिलांच्या जाण्यामुळेही त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. पण या सगळ्य़ा गोष्टींमधून तो आता स्वत:ला हळुहळु सावरताना दिसत आहे.