व्हिडिओ व्हायरल करेन म्हणत राष्ट्रसंत एकनाथ लोमटे महाराजांचा महीला शिष्येवर अत्याचार; पोलिसांनी घेतलं ताब्यात

धाराशिवमधील मलकापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वयंघोषित राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाणारे एकनाथ लोमटे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

२८ जुलै २०२२ ला एकनाथ लोमटे यांनी एका महिलेचा विनयभंग केला होता. त्यानंतर तिने पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तातडीने तपास सुरु केला. पण एकनाथ लोमटे हे फरार झाले होते.

तसेच तेवढ्या वेळ्यात एकनाथ लोमटे यांच्या वकिलांनी न्यायालयात याबाबत याचिका दाखल केली होती. त्यानुसार त्यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने मान्य केला होता. पण पीडित महिलेने न्यायालयात पुन्हा दाद मागितली. त्यानंतर न्यायालयाने पोलिसांना एकनाथ लोमटे यांना अटक करण्याचे आदेश दिले.

एकनाथ लोमटे हे त्यांच्या दैवी चमत्कारामुळे राज्यभरात प्रसिद्ध आहे. त्यामुळे अनेक भाविक दर्शनासाठी त्यांच्याकडे येत असतात. पीडित महिलाही दर्शनासाठी त्यांच्याकडे येत होती. त्यानंतर ती त्यांची शिष्य बनली होती. गेल्यावर्षी २८ जुलैलाही ही महिला दर्शनासाठी आली होती.

अशात दुपारी त्या महिलेला एकनाथ लोमटे यांनी एका खोलीत बोलवून घेतले आणि शरीरसुखाची मागणी केली. महिलेने जेव्हा याला नकार दिला, तेव्हा तुझे व्हिडिओ माझ्याकडे आहेत. ते मी व्हायरल करेन, असे म्हणत एकनाथ लोमटे यांनी तिचा विनयभंग केला.

त्यानंतर त्या महिलेने तिथून पळ काढला आणि पोलिस ठाण्यात गेली. महिला ही गेल्या काही महिन्यांपासून एकनाथ लोमटे यांची शिष्य होती. पण त्यांनीच असे केल्याने तिला पोलिस ठाण्यात धाव घ्यावी लागली. याप्रकरणी पोलिसांनी कलम ३५४ नुसार एकनाथ लोमटे यांच्यावर कारवाई केली आहे.