सुनेने केलेला स्वयंपाक खाल्ल्यावर सासू-सासरे वारले, पण सून बचावली; नेमकं रहस्य काय?

ऑस्ट्रेलियातून एक विचित्रच घटना समोर आली आहे. तेथील एका छोट्या गावात एक कुटुंब जेवायला बसलं होतं. पण त्या जेवणामुळे त्यांना त्रास होऊ लागला. जेवणामुळे त्यांची प्रकृती इतकी बिघडली की तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर चौथा अजूनही रुग्णालयात आहे.

अशात ज्या महिलेने त्यांना जेवण वाढलं होतं, तिला का नाही काही झालं? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच पोलिसांना तिच्यावर संशय असून तिचीही चौकशीही केली जात आहे. असे का झाले याबद्दल आपल्याला काहीही कल्पना नाही, असे त्या महिलेने म्हटले आहे.

माझं माझ्या कुटुंबावर खुप प्रेम आहे. त्यामुळे त्यांना दुखवण्याचा मी विचारही करु शकत नाही, असे तिने म्हटले आहे. तिने आपल्या कुटुंबासाठी मशरुमची भाजी बनवली होती. त्यानंतरच त्यांना त्रास होऊ लागला आणि त्यांचा जीव गेला. बाकीच्यांना त्रास होत असताना तिला काहीही झाले नाही, त्यामुळे तिच्यावर संशय व्यक्त केला जात आहे.

गेल आणि डॉन पॅटरसन हे त्यांच्या सुनेकडे जेवायला गेले होते. ऍरिन पॅटरसन असे त्यांच्या सुनेचे नाव आहे. त्यांच्या कुटुंबाबरोबरच त्यांच्या बहिणीचं कुटुंबही तिथे जेवणासाठी आलं होतं. संपुर्ण गावात त्यांचं कुटुंब प्रसिद्ध आहे.

ऍरिननने त्या सर्वांना जेवण बनवून खायला घातलं. त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे चार लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सुरुवातीला पोटदुखीचा त्रास होत असेल असे वाटत होते. पण प्रकृती जास्त गंभीर झाल्यामुळे त्यांना मेलबर्नच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले.

यामध्ये हिथर (६६) गेल (७०) यांचा आधी मृत्यू झाला होता. त्यानंतर डॉन (७०) यांचा मृत्यू झाला. तर इयान यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. पोलिसांच्या मते त्या चौघांनीही डेथ कॅप मशरुम खाल्ले आहे. त्यामुळे तिघांचा मृत्यू झाला आहे, तर चौथ्याची प्रकृती गंभीर आहे.

बाकीच्यांनी जे जेवण केलं तेच ऍरिनने केलं की नाही याबाबत पोलिसांना शंका आहे. ऍरिन तिच्या नवऱ्यापासून परस्पर संमतीने दुर झाली आहे, अशीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा घातपात असेल असेही म्हटले जात आहे. पण पोलिस याचा तपास करत आहे.