‘ताली’मध्ये मुख्य भूमिका सुष्मिता सेनची पण चर्चा होतेय ‘या’ मराठी कलाकाराची; अभिनय पाहून सगळेच थक्क

सध्या समाजातील सत्य परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या अनेक वेब सिरिज, चित्रपट प्रदर्शित होत आहे. आता नुकतीच ताली ही वेबसिरीज प्रदर्शित झाली आहे. या वेब सिरिजची खुप चर्चा होत आहे. गौरी सावंत यांच्यावर ही वेब सिरिज आधारित आहे. सुष्मिता सेन या वेब सिरिजमध्ये मुख्य भुमिकेत आहे.

गौरी सावंत या एक तृतीयपंथी असून त्या सामाजिक कार्यकर्त्या सुद्धा आहे. त्यांनी २०१० मध्ये तृतीयपंथींच्या हक्कासाठी सखी चारचौघी ही संस्था स्थापन केली होती. ट्रान्सजेंडर आई म्हणूनही त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती.

तृतीयपंथी असल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना नाकारलं होतं. त्यामुळे घर सोडलेल्या तृतीयपंथींसाठी त्या काम करु लागल्या. या वेब सिरिजमध्ये गणेश सावंत ते गौरी सावंतपर्यंतचा प्रवास प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

या सिरीजमध्ये अनेक मराठी कलाकार आहे. त्यातलाच एक म्हणजे सुव्रत जोशी. या वेबसिरिजमध्ये त्याने जो अभिनय केला आहे, त्याचं मोठ्या प्रमाणात कौतूक होत आहे. या वेब सिरिजमध्ये सुव्रतने एका ट्रान्सजेंडरची भूमिका साकारली आहे. त्याचा वेब सिरिजमधला अभिनय पाहून त्याची पत्नी सखी गोखलेनेही एक पोस्ट केली आहे.

सुव्रत आज मला तुझा अभिमान वाटतोय. किती सुंदर परफॉर्मेन्स दिलाय तू. आपण एकत्र राहत होतो . पण तु या भुमिकेची तयारी कशी करत होता? असा प्रश्न मला आजही पडतो. तुझ्या भूमिकेतील संवेदनशिलता तुझ्या अभिनयातून पोहचतेय. सतत अपमानित केलं जात असलेलं जेंडर दाखवण्यासाठी तु खुप प्रयत्न केले आहेत. असंच कायम स्वत:ला आव्हान देत राहा, असे सखी गोखलेने म्हटले आहे.

दरम्यान, या वेब सिरीजमध्ये अनेक मराठी कलाकार दिसून आले आहे. ऐश्वर्या नारकर, हेमांगी कवी या देखील या वेब सिरिजमध्ये आहे. तसेच गौरी म्हणजे लहानपणीच्या गणेशची भूमिका कोणत्या अभिनेत्याने नाही तर अभिनेत्री कृतिका देव हिने साकारली आहे. तर गौरी सावंतच्या वडिलांच्या भूमिकेत नंदू माधव दिसून आले आहे.