छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन मुलांनी मिळून एका अल्पवयीन मुलीचे विवस्त्र फोटो काढून इंस्टाग्रावर व्हायरल केले आहे. या घटनेमुळे संपुर्ण शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी त्या तीन तरुणांवर पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून एक आरोपी मात्र फरार झाला आहे. अनिकेत राठोड, कुणाल बावत आणि उमेश पाशा असे त्या तीन तरुणांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी उस्मानपूर भागातील एका महाविद्यालयात १२ वी सायन्समध्ये शिकते. ती सध्या एका वस्तीगृहामध्ये राहत आहे. महाविद्यालयात शिकत असताना तिची ओळख सिनियर्स असलेल्या अनिकेत राठोड, कुणाल बावत आणि उमेद पाशा यांच्याशी झाली.
१५ जुनला ते तिघेही एका पार्टीला गेले होते. त्यावेळी त्या अल्पवयीन मुलीला त्यांनी तिथे बोलवले. महाविद्यालयाच्या जवळच ते हॉटेल असल्यामुळे आणि सिनियर आहेत म्हणून विश्वास असल्यामुळे ती मुलगी तिथे गेली.
त्यावेळी तिथे बोलवून त्यांनी तिचे विविस्त्र फोटो काढले आणि सोशल मीडियावर ते व्हायरल केले. ही गोष्ट त्या मुलीच्या लक्षात आल्यानंतर तिने तातडीने पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी त्या तिघांवर गुन्हा नोंदवून घेतला आहे.
या घटनेला गांभीर्याने घेत पोलिसांनी लगेचच त्या तिन्ही तरुणांचा शोध सुरु केला होता. पोलिस आपल्या मागे लागलेत हे त्यांना कळाल्यावर ते फरार होण्यासाठी तयारी करत होते. पण पोलिसांनी त्यांना वेळेत पकडले आहे. दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. पण तिसरा आरोपी मात्र फरार झाला आहे.