---Advertisement---

कोकण हार्टेड गर्लला घाटात लागला चकवा, भयानक अनुभव केला शेअर; म्हणाली, मी पुन्हा पुन्हा…

---Advertisement---

कोकण हार्टेड गर्ल म्हणून ओळखली जाणारी अंकिता वालावलकर ही सोशल मीडियावर खुप चर्चेत असते. झी मराठीच्या पुरस्कार सोहळ्यामध्येही ती दिसली होती. नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असणारी अंकिता आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.

अंकिताने तिच्या युट्युब चॅनेलवर एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यामध्ये तिने कोकणात तिला आलेल्या एका भयानक अनुभवाबद्दल सांगितले आहे. आपल्याला प्रवास करत असताना चकवा लागला होता, असे तिने म्हटले आहे.

दरवेळी मी गगनबावडा या घाटामधून जाते. पण यावेळी वेगळा मार्ग म्हणून मी मॅपनुसार फोंडा घाटातून जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी आम्हाला एक भयानक अनुभव आला. आम्हाला चकवा लागला होता, असे अंकिताने म्हटले आहे.

चकवा लागलेला असतानाच तिला एक विचित्र गोष्ट दिसली. समोर काहीतरी जळत होतं असं त्यांना दिसलं. त्यामुळे त्यादिशेने ती गाडी घेऊन गेली तर तिथे स्मशानभूमी होती. तिथे एक मृतदेह जळत होता. ती फिरुन पुन्हा त्याच रस्त्यावर येत असल्याचे तिने म्हटले आहे.

चकवा या प्रकाराबद्दल सगळेजण ऐकून आहे, त्याबाबत नेहमी चर्चा केली जाते. पण कोणीही त्याला प्रत्यक्षात अनुभवला नसल्यामुळे कोणालाही त्याबाबत जास्त सांगता येत नाही. त्याबद्दल बोलताना माणूस फिरुन त्याच रस्त्यावर येतो असे म्हटले जाते.

अशात हाच अनुभव अंकिताला आल्यामुळे ती खुप घाबरली होती. या सर्व गोष्टींवर आपला विश्वास नाही, असे अंकिताने म्हटले आहे. पण या घटनेमुळे आपण खुप घाबरलो होतो, असेही तिने सांगितले आहे. सध्या तिचा हा व्हिडिओ चर्चेत आला असून लाखो लोकांनी हा व्हिडिओ बघितला आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---