मार खाऊनही मालकाच्या अंत्यसंस्काराला पोहचले मुके वासरू; मृतदेह पाहताच रडून रडून झाले बेहाल

आजच्या काळात माणसाचा माणसावर विश्वास राहिलेला नाही. कधी कोण आपली साथ सोडेल हे सांगता येत नाही. पण प्राण्यावर एकदा प्रेम केले की तो कायम आपल्याशी एकनिष्ठ राहतो हे अनेकदा दिसून आले आहे.

माणूस अनेकदा कुत्रा, मांजर, गाय, घोडा यांना पाळताना दिसतो. त्यांच्यावर खुप प्रेम करतो. त्या प्रेमाची परतफेड करताना अनेक प्राणी हे जीवाचीही पर्वा करत नाही. ते नेहमीच त्यांच्या मालकाशी एकनिष्ठ राहतात.

अशीच एक घटना आता झारखंडच्या रांचीमधून समोर आली आहे. प्रेम काय असते हे आता एका वासराने दाखवून दिले आहे. त्याच्या मालकाचा मृत्यू झालानंतर वासरु हे दोरी तोडून त्याच्या अंत्यसंस्कारासाठी गेले होते. इतकेच नाही तर सर्व विधीमध्येही ते सामील झाले होते.

वासराला असे पाहून अंत्यसंस्कारासाठी आलेल्या लोकांचेही डोळे पाणावले होते. रांचीतील हजारीबाग येथे ही घटना घडली आहे. चौपारनच्या चौथी ग्रामपंचायत येथील मेवालाल ठाकूर यांचे निधन झाले होते.

निधनानंतर त्यांना अंत्यसंस्कारासाठी घरापासून लांब एका स्मशानभूमीजवळ नेले होते. कदाचित वासरलाही आपल्या मालकाचा मृत्यू झालाय हे कळले असावे. आता आपले मालक कधीच दिसणार नाही अशी जाणीवही त्याला झाली असावी. त्यामुळे वासरुही त्याठिकाणी आले.

विशेष म्हणजे त्या वासराला बांधून ठेवलेले होते. पण मालकाला पाहण्यासाठी त्याने दोरी तोडून स्मशानभूमी गाठली आहे. सुरुवातीला लोकांनी त्याला बाजूला सरकवण्यासाठी काठ्याही मारल्या पण ते वासरु सरकण्यासाठी तयार नव्हते.

ते वासरु तिथेच बसून राहिले. त्यामुळे त्यांनी त्या वासराला चेहरा दाखवण्याचा निर्णय घेतला. मालकाचा चेहरा बघितल्यानंतरही ते तिथेच बसून राहिले. त्याच्या डोळ्यातही अश्रू दिसून येत होते. त्यांचे प्रेम पाहून तेथील लोकांनीही त्याला बाजूला केले नाही. संपुर्ण अंत्यविधी होईपर्यंत ते वासरु तिथेच होते.

तसेच अंत्यसंस्कारावेळी माणूस जे जे काम करतो ती सर्व कामे त्या वासराने केली. वासराने त्याच्या तोंडात लाकूड घेतले आणि मुखाग्नी दिला. संपुर्ण विधी होईपर्यंत वासरु तिथेच होते. मेवालाल यांना मुलबाळ नव्हते. त्यामुळे त्यांनी त्या वासराला मुलाप्रमाणेच सांभाळले होते. पण पैशांची कमी असल्यामुळे त्यांनी त्याला शेजारी राहणाऱ्या एका माणसाला विकून दिले होते. पण वासरु मात्र आपल्या मालकाला विसरलेला नव्हता.