मी देवाला मानत नव्हतो, स्वामी कोण हेही माहित नव्हतं, पण अचानक चमत्कार झाला अन्..; तरडेंनी सांगितला ‘तो’ किस्सा

प्रवीण तरडे हे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध नाव आहे. अभिनेता, दिग्दर्शक म्हणून त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ते त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत येत असतात. अशात प्रवीण तरडे हे एका जुना चित्रपटामुळे चर्चेत आले आहे. त्यांनी एक किस्सा सांगितला आहे.

प्रवीण तरडे यांनी २०१५ मध्ये देऊळ बंद हा चित्रपट काढला होता. त्या चित्रपटाला खुप प्रसिद्धी मिळाली होती. तो चित्रपट श्रीस्वामी समर्थांवर आधारित होता. लोकांना हा चित्रपट प्रचंड आवडला होता. आजही देऊळ बंद हा चित्रपट लोक आवडीने पाहतात.

झाले असे की प्रवीण तरडे यांनी स्वामींवर एक डॉक्युमेंटरी बनवायची होती. पण त्यांना ते कथानक एवढे आवडले की त्यांनी थेट चित्रपट बनवण्याचाच निर्णय घेतला. विशेष म्हणजे प्रवीण तरडे देवाला मानत नव्हते तरीही त्यांनी यावर चित्रपट बनवला.

तरडे यांचे आईवडिल हे दोघेही विठ्ठलाचे भक्त आहे. पण ते स्वत: देवाला जास्त मानत नव्हते. देवाची पूजा, उपवास एवढंच ते करायचे. त्या काळात चित्रपटसृष्टीत आपली जागा बनवण्यासाठी त्यांचा स्ट्रगल सुरु होता. त्यावर त्यांना स्वामींवर डॉक्युमेंटरी बनवण्याची संधी मिळाली.

प्रवीण तरडे त्यावेळी मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यक्रमांचे मॅनेजमेंट करत होते. त्यावेळी एका कार्यकर्त्याने तरडेंना सांगितले की कैलास वाणी यांना एक डॉक्युमेंटरी बनवायची आहे. त्यामुळे त्यांना जाऊन एकदा भेटून या. प्रवीण तरडेंना संधी मिळाल्यामुळे त्यांनी कैलास वाणींची भेट घेतली.

कैलास वाणी यांच्या घरी स्वामींचा मोठा फोटो होता. पण स्वामी कोण हे तरडेंना अजिबात माहिती नव्हते. त्यांची भेट झाली तेव्हा कैलास वाणींनी त्यांना सांगितलं की मला स्वामींवर एक डॉक्युमेंटरी बनवायची आहे. त्यावेळी प्रवीण तरडे थोडे कन्फ्युज झाले.

प्रवीण तरडेंना वाटले होते समर्थ रामदास स्वामींवर डॉक्युमेंटरी बनवायची आहे. त्यानंतर त्यांनी स्वामींचा फोटो दाखवला आणि यांच्यावर आपल्याला डॉक्युमेंटरी बनवायची आहे, असे सांगितले. तसेच त्यासाठी त्यांनी ५ लाखांचं बजेट असल्याचेही सांगितले.

एवढ्या बजेटमध्ये काहीच होणार नाही असा विचार प्रवीण तरडेंच्या मनात आला होता. पण तरीही त्यांना करु असे म्हणत कैलास वाणी यांना आश्वासन दिलं. कैलास यांनी सांगितलं की आपल्याला उद्या नाशिकला निघायचंय. तोपर्यंत स्टोरी तयार ठेवा. त्यामुळे माझ्याकडे खुप वेळ आहे, असे म्हणत प्रवीण तरडे घरी जाऊन झोपी गेले.

दुसऱ्या दिवशी सकाळीच कैलास वाणी यांचा फोन आला ते म्हणाले की आपल्याला नाशिकला निघायचंय. त्यामुळे मी उठलो आणि त्यांच्याकडे गेलो तर तिथे अप्पा बारणे बसलेले होते. आम्ही तिघे लगेचच नाशिकला निघालो, असे प्रवीण तरडे यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले की, मला वाटलं नाशिक जायला वेळ लागेल मी स्टोरी तोपर्यंत लिहून टाकेन. पण गाडीत मला त्रास होत असल्यामुळे मी थेट नाशिकलाच उठलो. मला वाटलं मंदिराची रांग, आरती यामुळे वेळ लागेल तोपर्यंत तर मी लिहूनच टाकेन. पण आम्हाला थेट माऊलींना भेटण्यासाठी नेण्यात आले.

प्रवीण तरडे पुढे म्हणाले की, माऊली समोर आले आणि म्हणाले की, सांगा स्टोरी. पण मी तर स्टोरीच लिहिली नव्हती. त्यामुळे मी त्यांना माझीच स्टोरी सांगायला सुरुवात केली. मी त्यांना सांगितलं की, एक शास्त्रज्ञ असतो तो नास्तिक असतो. त्याला तुमचे स्वामी आवडत नसतात. पुढे मी चित्रपटात जे घडलं ते सांगितलं. पण मला हे कळलं नाही की मला हे कसं सुचलं. कदाचित खुप एकांकिका ऐकल्यामुळे मी त्यांना इतकं सांगितलं असावं.

ते म्हणाले की, मी जेव्हा माझी स्टोरी संपवली, तेव्हा माऊलींनी मला प्रश्न केला. तुम्ही खरंच देव मानता का? त्यावेळी त्यांनी आपल्याला पकडलं असं कळल्यावर मी त्यांना नाही असं सांगितलं. मग ते म्हणाले की, ही स्टोरी आधी सुचली की आता बनवली? मग मी म्हणालो आता सुचली. त्यावर माऊली उठले आणि हसायला लागले. ते म्हणाले की, त्यांना वाटेल ते बजेट द्या आणि यावर डॉक्युमेंटरी नाही तर चित्रपट बनवा. त्यानंतर देऊळ बंद हा चित्रपट बनला.