चित्रपटातील किसींग सीन्स खरे असतात की खोटे? बोल्ड सीन्स शुट करायच्या ट्रिक्स समजल्यावर हैराण व्हाल

सध्या चित्रपटांपेक्षा वेब सिरिज जास्त चर्चेत येत असतात. त्याचे एकमेव कारण म्हणजे त्यांच्यावर सेन्सॉर बोर्ड लागू होत नाही. बंधन नसल्यामुळे अनेक बोल्ड सीन्स त्यामध्ये दिसून येतात. ते लोकांना प्रचंड आवडत असल्यामुळे दिग्दर्शकही आपल्या वेब सिरिजमध्ये इंटिमेट सीन्सवर भर देताना दिसतात.

चित्रपटातही इंटिमेट सीन्स असतात, पण त्याचे प्रमाण खुप कमी असते. असे असले तरी प्रेक्षकांसाठी दिग्दर्शक तसे सीन्स ठेवतात. किसिंग सीन्सही चित्रपटामध्ये दाखवले जातात. पण एखादा अभिनेता आणि अभिनेत्री इतक्या लोकांसमोर कसे किस करु शकतात? असाही प्रश्न लोकांना पडत असतो.

तसेच काहीवेळा अनेक अभिनेता आणि अभिनेत्री एकमेकांना किस करण्यासाठी तयार नसतात, त्यावेळी दिग्दर्शक एक सीन शुट करण्यासाठी वेगवेगळे प्लॅन करतात. ते सीन शुट करण्यासाठी बॉडी डबलही वापरतात.

तसेच काहीवेळा हिरो आणि हिरोईन्सच्या दोघांमध्ये एक आरसा लावला जातो. त्यानंतर ते दोघेही आरशाला किस करतात. अशाप्रकारे चित्रपटाचा किसिंग सीन शुट होतो. पण प्रेक्षकांना वाटते की ते दोघेही एकमेकांना किस करताय.

किसिंग सीन सोडून काहीवेळा बोल्ड सीन्स द्यावे लागत असतात. त्यावेळी जर अभिनेता आणि अभिनेत्रीने नकार दिला तर इल्युजन क्रिएट करुन क्रु मेंबरर्स ब्युटी शॉर्टवर काम करतात. त्यासाठी सिनेमाटोग्राफर वेगवेगळ्या कॅमेरा टेक्निक्स वापरतो.

ब्युटी शॉट्समध्ये शरीराचे भाग दाखवले जातात. त्यावेळी त्यांचा चेहरा दाखवला जात नाही. हे सर्व सीन्स अनेकदा बॉडी डबलच करत असतात. तसेच बऱ्याचदा बेडवर सॅनिटचे बेडशीट्स वापरुन इल्युजन क्रिएट केले जाते.

काहीवेळा बॉडी डबल भेटत नसेल तर ते सीन्स अभिनेता किंवा अभिनेत्री क्रोमासोबत शुट करतात. ते एका हिरव्या किंवा निळ्या बाहुल्याबरोबर ते सीन्स देतात. त्यानंतर एडिटिंग करुन ते सीन्स व्यवस्थित केले जातात. तसेच किंसिंग सीनसाठी काही वेळा दुधी भोपळा वापरतात कारण तो हिरवा असल्यामुळे त्याला एडिट करणे सोपे जाते.

कोणत्याही इंटिमेट सीनसाठी अभिनेता आणि अभिनेत्रीची परवानगी आवश्यक असते. अशावेळी शुट करताना प्रायव्हसीची खुप काळजी घेतली जाते. अभिनेत्रीला टॉपलेस दाखवायचं असल्यास पुढे सिलिकॉन पॅडचा वापर केला जातो. तसेच पिलो, क्रोच गार्ड, मोडेस्टी गार्मेंट अशाही गोष्टींचा वापर केला जातो.