दिल्लीमधून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या अनेक धक्कादायक घटना समोर येत असतात. आता अशीच एक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्याच मित्राच्या मुलीवर अत्याचार केला आहे. या घटनेमुळे संपुर्ण परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
धक्कादायक गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तीने अत्याचार केले तो आधी अधिकारी होता. पण त्याला निलंबित करण्यात आले होते. मित्राच्या मुलीवर अत्याचार करण्याआधी तो नेहमी तिला बेशुद्ध करायचा. या अत्याचारामुळे तिच्या शरीरावर मोठ्या प्रमाणात जखमाही झाल्या होत्या.
मुलीच्या वडिलांचे निधन झाले आहे. कोरोना काळामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. २०२० मध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतरच आरोपीने मुलीवर अत्याचार करण्यास सुरुवात केली. प्रेमोदय खाखा असे त्या निलंबित अधिकाऱ्याचे नाव आहे.
३१ ऑक्टोबर २०२० मध्ये त्याने त्या मुलीवर पहिल्यांदा अत्याचार केला होता. वडिलांच्या निधनामुळे मुलीला फार मोठा धक्का बसला होता. त्यामुळे तिच्या आईने तिला आरोपीच्या घरी राहण्यासाठी पाठवलं होतं.
प्रेमोदय खाखा यांनी त्या मुलीचं पालकत्व स्वीकारलं होतं. वडिलांचा मित्र असल्यामुळे चिमुकलीच्या आईनेही त्याच्यावर विश्वास दाखवला होता. आपण तिची काळजी घेऊ असे त्या निलंबित अधिकाऱ्याने मित्राच्या पत्नीला सांगितलं होतं.पण नंतर मुलीवर अत्याचार होताय हे माहिती असूनही तिने काहीच केले नाही.
पाच महिन्यानंतर ती आपल्या घरी गेली तर ती परतलीच नाही. वडिलांचे निधन, पॅनिक अटॅकचा त्रास यामुळे ती तक्रार करत नव्हती. अशात तिला एकदा पॅनिक अटॅक आल्यामुळे तिला रुग्णलायमध्ये नेण्यात आलं होतं. त्यावेळी डॉक्टरांनी तिच्या शरीरावरच्या जखमा बघितल्यानंतर हा सर्वप्रकार उघडकीस आला आहे.
तसेच याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्या आरोपीसह मुलीच्या आईलाही ताब्यात घेतले आहे. अत्याचारामुळे मुलगी गर्भवती झाली होती. त्यावेळी मुलीच्या आईने तिला गर्भनिरोधक गोळ्या दिल्या होत्या. अशीही माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करुन पोलिस कारवाई करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रेमोदय खाखा हे दिल्ली सरकारच्या महिला आणि बालविकास विभागात अधिकारी म्हणून काम करत होते. पण त्यांना निलंबित करण्यात आले होते.