जालनामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने वडिलांच्याच मित्राच्या मुलीला गर्भवती केले आहे. जबरदस्ती करुन तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आला. त्यानंतर ती गर्भवती झाली होती. त्यामुळे घाबरलेल्या तरुणाने तिथून पळ काढला आहे.
खरपूर रोडवरील लक्ष्मीनगर भागात संबंधित घटना घडली आहे. १९ वर्षीय तरुणी महाविद्यालयीन क्लासमध्ये अकाऊंटट म्हणून काम करत होती. तर तरुण हा तिच्या वडिलांच्या मित्राचा मुलगा होता. सोहेल अनिस पठाण असे त्याचे नाव होते.
तरुण हा तरुणीच्या वडिलांच्या व्यवसायात मदत करत होता. त्यामुळे एकदा वडिलांनी मुलीच्या फोनवर त्याला फोन लावला होता. या गोष्टीमुळे त्याला तिचा नंबर मिळाला होता. मुलीचा नंबर मिळाल्यामुळे त्याने तिला वारंवार फोन करण्यास सुरुवात केली.
तसेच सुरुवातीला तिच्यासोबत मैत्री केली, त्यानंतर त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. एकदा त्याने आझार मैदानावर बोलावून तिला एका कॅफेत नेले आणि लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला.
त्यानंतर तो सतत तिला कॅफेमध्ये घेऊन जायचा. तिथे तो पैसे देऊन खोली बुक करायचा आणि तिच्यावर अत्याचार करायचा. अशात ती ३ जुनला गर्भवती राहिली होती. त्यामुळे त्याने तिला गर्भपाताच्या गोळ्या तिला दिल्या. पण तिचा गर्भपात झाला नाही.
सोहेलने त्यानंतर तिला पुन्हा गोळ्या आणून दिल्या. कोणत्याही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय त्याने तिला तीन वेळा गर्भपात होण्याच्या गोळ्या दिल्या. त्यामुळे तिला रक्तस्त्राव सुरु झाला. तिच्या अशा स्थितीमुळे तिला सोहेलने एका खाजगी रुग्णालयामध्ये दाखल केले आणि तिथून पळ काढला.
सोहेल फोन उचलत नसल्यामुळे तरुणी खुप घाबरली होती. त्यानंतर तिना तिच्या पालकांना याबाबत माहिती दिली. पालकही लगेच रुग्णालयामध्ये आले. त्यानंतर तरुणीने घडलेल्या सर्व गोष्टी सांगितल्या. पालकांनी याप्रकरणी पोलिस तक्रार दाखल केली आहे. आता पोलिस त्याचा शोध घेत आहे.