गेल्या काही महिन्यांपासून रस्ते अपघाताच्या अनेक धक्कादायक घटना घडत आहे. अनेकांना तर यामध्ये आपला जीवही गमवावा लागत आहे. अशीच एक घटना आता पुण्यातील हिंजवडी भागातून समोर आली आहे.
बुधवारी सकाळी कामाला निघालेल्या एका तरुणाचा हिंजवडीमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे. एका भरधाव ट्रकने त्याच्या बाईकला जोरदार धडक दिली होती. त्यामुळे त्याचा अपघात झाला आहे.
भरधाव ट्रकने धडक दिल्यानंतर तरुण हा ट्रकच्या मागच्या चाकामध्ये अडकला होता. त्यानंतर तेच चाक त्याच्यावर पोटावरुन गेले होते. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता. २० मिनिटे तो तिथे तसाच पडून होता. त्यानंतर तेथील नागरिकांनी त्याला रुग्णालयात नेले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
रामदास वडजे असे त्या तरुणाचे नाव होते. तो सकाळी ७.३० च्या सुमारास कामाला चालला होता. त्यावेळी हा अपघात घडला होता. हा अपघात हिंडवडीतील लक्ष्मी चौकात घडला. याप्रकरणी आता रामदासचा भाऊ संजय वडजे यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
रामदास सकाळी त्याच्या बाईकवरुन जात होता. त्यावेळी एक ट्रक भरधाव वेगात मागून आला आणि त्या ट्रकने त्याला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की तो थेट त्या ट्रकच्या खाली आला. तो मागच्या टायरला अडकला होता.
टायरमध्ये अडकल्यामुळे तो अंतर त्या ट्रकसोबतच गेला. त्यानंतर एक टायर त्याच्या अंगावरुन गेले. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. अपघातानंतर ड्रायव्हर तिथून पळून गेला. रामदास तिथे लोकांना वाचवा वाचवा असे म्हणत विनंती करत होता. पण २० मिनिटे तिथे कोणीच आले नाही. त्यानंतर काही नागरिकांनी त्याला ट्रक खालून काढत रुग्णालयामध्ये दाखल केले. पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.