---Advertisement---

क्रूरतेचा कळस! मंदिरासमोर चिमुरड्याला लाथ मारून केले बाजूला, संतापजनक व्हिडिओ व्हायरल…

---Advertisement---

सोलापूरमध्ये यमाई देवीच्या मंदिरातील एक संतापजनक व्हिडीओ सोशल व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओमध्ये मंदिर परिसरात मुलं खेळत असतात. एक लहान मूल पळत पळत येत असतानाच किराणा माल घेऊन जात असलेला एक व्यक्ती त्या मुलाला जोरात लाथ मारतो.

यामुळे या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. मुलाच्या रडण्याच्या आवाजाने मुलाची आई बाहेर येते अन् त्याला शांत करते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चिमुरड्याला लाथाडणाऱ्या व्यक्तीला शिक्षा झाली पाहिजे अशी नेटकऱ्यांची मागणी आहे. यामुळे याची सध्या चर्चा सुरू आहे.

हा व्हिडीओ मार्डी (ता. उ. सोलापूर) येथील यमाई मंदिर परिसरातील आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. मुलं देवाघरची फुलं मग लाथ का मारली, मानसिक तणावातून केले आहे का ? त्याला अद्दल घडविली पाहिजे, त्याला शोधणं अवघड नाही, अशा कमेंट यावर येत आहेत.

यामुळे पोलीस याचा तपास करणार का.? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. लहान मुलाला लाथ मारून काय साध्य केले, अशा संतापजनक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी पोस्ट केल्या आहेत. यामुळे कारवाईची मागणी केली जात आहे.

दरम्यान, हा प्रकार समोर आल्यावर हा व्हिडिओ व्हायरल झाला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्सच्या माध्यमातून तो व्यक्ती मनोरुग्ण असेल. त्याला कडक शिक्षा व्हायला हवी, अशी मागणी केली आहे.

गुरुवारी सकाळी मंदिर परिसरात हा प्रकार घडला. याबाबत सविस्तर माहिती समोर आली नाही. याबाबत पोलीस तपास करणार का हे देखील अजून स्पष्ठ झाले नाही. 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---