आई कुठे काय करते मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन; ‘या’ गंभीर आजाराशी झुंज अपयशी

मराठी मालिका, चित्रपटांमध्ये काम करणारे सुप्रसिद्ध अभिनेते मिलिंद सफई यांचे निधन झाले आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. मिलिंद गेल्या काही महिन्यांपासून कर्करोगाशी झुंज देत होते. अखेर त्यांचे निधन झाले आहे.

कलाविश्वाकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. अभिनेते जयवंत वाडकर यांनी फेसबुक अकाऊंटद्वारे एक पोस्ट शेअर केली. यामध्ये त्यांनी ही दुःखद माहिती दिली आहे. जयवंत वाडकर म्हणाले, अभिनेते मिलिंद सफई यांचे कर्करोग या आजाराने निधन.

यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांनी अनेक मराठी मालिकांमध्ये काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्यांच्या भूमिका देखील प्रेक्षकांना आवडल्या. त्यांनी लकडाऊन बी पॉझिटिव्ह, प्रेमाची गोष्ट, थ्यँक्यु विठ्ठला, मेकअप, पोस्टर बॉईज सारख्या चित्रपटांमध्ये काम केले.

तसेच अनेक मालिकांमध्ये त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करुन राहिल्या. यामुळे अनेक कलाकारांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. मालिकांमधून ते घराघरात पोहोचले होते.

मराठी मालिकेतला बाप हरपल्याची प्रतिक्रिया प्रेक्षकांमधून येत आहे. आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मालिकेत त्यांनी अरुंधतीच्या वडिलांची भूमिका साकारली होती. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण मराठी कलाविश्वातून शोक व्यक्त होत आहे.

चाहत्यांनी आणि नेटकऱ्यांनी मिलिंद सफई यांच्या आठणींना उजाळा देत, त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच अंतिम दर्शनाला देखील अनेकजण उपस्थित होते.