मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. येथे एका महिलेने वृद्ध पतीची दगडाने ठेचून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत पोलीस सध्या तपास करत आहेत. मीरा रोड याठिकाणी ही घटना घडली आहे.
याबाबत माहिती अशी की, हे दाम्पत्य त्यांच्या 30 वर्षीय मुलासह मीरा रोड येथील आनंद सरिता इमारतीत राहत होते. सायंकाळी अचानक गुप्ता यांच्या फ्लॅटमधून ओरडण्याचा आवाज आला. यामुळे इमारतीतल्या सुरक्षा रक्षकांनी आणि शेजाऱ्यांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली.
यावेळी समोरील दृश्य बघून धक्काच बसला. घरात जाऊन पाहिले असता रमेश गुप्ता रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडले होते. तर पत्नी राजकुमारी त्यांच्या शेजारी उभ्या होत्या. यामुळे त्यांनी असे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत पोलीस तपास करत आहेत.
घटनेनंतर शेजारच्यांनी पोलिसांना आणि त्यांच्या मुलाला याबाबत माहिती दिली. नैराश्यातून राजकुमारी यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासानंतर समोर आली आहे. राजकुमारी यांना अटक करण्यात आली आहे.
राजकुमारी यांनी पतीसोबत झालेल्या वादातून ही घटना घडल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. पण नेमक्या कोणत्या कारणांमुळे वाद झाला याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. मुलाने सांगितले की सकाळी मी कामावर जाताना सर्वकाही ठीक होते.
दरम्यान, गुप्ता यांचीही प्रकृती चांगली नव्हती. त्यांची मानसिक स्थिती ठीक नसून ती नैराश्यात होती, त्यामुळे तिचे अनेकदा भांडण होत होती, असे सांगितले जात आहे. मृत शर्मा यांच्या मुलाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी महिलेला आयपीसीच्या कलम 302 अंतर्गत अटक केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. सध्या पोलीस राजकुमारी यांची वैद्यकीय पार्श्वभूमी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. या घटनेने मात्र एकच खळबळ उडाली आहे. पोलीस सध्या तपास करत आहेत.