राज्यात सध्या मोठ्या प्रमाणावर अपघात होत आहेत. यामध्ये अनेकांचे जीव जात आहेत. यामध्ये नुकताच तयार करण्यात आलेल्या समृद्धी महामार्गावर रोजच अपघात होत आहेत. राजस्थानमधील उदयपूर येथील गीतांजली मेडिकल कॉलेज रुग्णालयाच्या नेत्ररोग विभागाच्या प्रमुखांचे वर्धा येथे निधन झाले आहे.
या महामार्गावर त्यांची कार दुभाजकाला धडकली. यात डॉ. नूतन बेदी यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा अक्षरशः भुगा झाला आहे. तसेच यामध्ये त्यांचा मुलगा डॉ. गौतम बेदी हा देखील गंभीर जखमी झाला आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
केळझरजवळ ही घडली आहे. त्या नागपूरहून वर्ध्याला जात असताना हा अपघात घडला. यामुळे त्यांचा जीव यामध्ये गेला. त्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नागपुरात आल्या होत्या. कार्यक्रम आटोपल्यानंतर डॉक्टर आई आणि मुलगा समृद्धी महामार्गाने वर्ध्याला जाण्यासाठी आपल्या कारने निघाले.
यावेळी गौतमचे कारवरुन नियंत्रण सुटले, आणि हा अपघात झाला. तीन-चार वेळा गाडी पलटी झाली. अपघातात कारचा चुराडा झाला आहे. तसेच या अपघातात डॉ. नूतन बेदी यांचा जागीच मृत्यू झाला.
नंतर डॉ. गौतम बेदी यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू केले आहेत. त्याचबरोबर डॉ. नूतन यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. यामुळे नातेवाईकांना एकच धक्का बसला आहे. अपघातानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.
दरम्यान, समृद्धी महामार्गावर सध्या मोठ्या प्रमाणावर अपघात होत आहेत. यामध्ये अनेकांचे जीव जात आहेत. हा महामार्ग एक विकासाचा मार्ग म्हणून ओळखला जात होता. मात्र आता याला अपघाताचा मार्ग म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.