शेतकऱ्यांना सुखावणारी बातमी! मान्सून सक्रिय, ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुढील ६ दिवस जोरदार बरसणार

शेतकऱ्यांना सध्या अनेक संकटाना सामोरे जावे लागत आहे. सध्या पावसाने ओढ दिल्याने पिकांवर परिणाम झाला आहे. असे असताना आता शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.

आता पुन्हा पावसाचा हलक्या सरी बरसायला सुरुवात झाली आहे. असाच पाऊस येणाऱ्या पाच ते सहा दिवस पडणार आहे. असा अंदाज हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी वर्तवला आहे. यामुळे शेतकऱ्याचे आभाळाकडे लक्ष लागले आहे.

यामध्ये ०१ मिलिमीटर तर काही दिवशी १५ मिलिमीटर पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आवली आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्र म्हणजे अहमदनगर, पुणे जिल्हा, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या सहा जिल्ह्यात ३१ ऑगस्टपर्यंत अत्यल्प पाऊस म्हणजे ०५ ते १.५ मीमी पाऊस असणार आहे.

यामुळे चांगला पाऊस झाला तर धरणे भरण्यास मदत होणार आहे. तसेच पिके देखील वाचणार आहेत. तसेच कोकण भागात सिधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर या पाच जिल्ह्यातील पावसाची स्तिथी अतिशय कमी असणार आहे.

इतर सर्व जिल्ह्यात ०.१ ते १.३ मिलिमीटर पर्यंत पाऊस राहणार आहे. असा अंदाज हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी वर्तवला आहे. यामुळे आता तरी पाऊस पडणार का.? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, राज्यात सध्या काही जिल्हे हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहेत, अशी माहिती हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी दिली आहे. यामुळे पाऊस हा खूप गरजेचा झाला आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.