बीडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी गेवराई शहरात गणेश नगर भागातील एक मुलीने आत्महत्या केली आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे. ही मुलगी ११ वी च्या वर्गात शिक्षण घेत होती. ती पहाटे घरातून निघून गेली होती.
यामुळे मोठी खळबळ उडाली होती. तिचा शोध सगळीकडे घेतला जात होता. नंतर एका विहीरीत तिचा मृतदेह सापडला. सायली कल्याण पारेकर असे मृत मुलीचे नाव आहे. तिने असा निर्णय का घेतला याबाबत पोलीस तपास करत आहेत.
तिची सुसाईड नोट सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये मी मरतीय, माझा शोध घेऊ नका व कोणालाच जबाबदार धरू नका, असे तिने म्हटले आहे. नंतर तिच्या नातेवाईकांनी मुलीचा शोध सुरु केला होता. एका विहिरीत तिचा मृतदेह सापडला होता.
यानंतर पोलीसांनी शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या सहाय्याने तपास सुरु केला. मात्र यात पोलिसांना काही धागेदोरे मिळाले नाही. गोविंदवाडी शिवारात मॉर्निंग वॉक करत असताना नागरिकांना येथील विहिरीत तरुणीचा मृतदेह आढळून आला.
नंतर पोलिस उपनिरीक्षक युवराज टाकसाळ यांनी घटनास्थळी पाहणी केली. मृतदेह बाहेर काढल्यानंतर तिची ओळख पटली. याबाबत तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नसून पोलीस तपास सुरु आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे.
दरम्यान, मुलीने सुसाईड नोटमध्ये जास्त माहिती दिली नाही. पोलीस पुढील तपास करत आहेत. यामुळे याबाबत तिच्या शाळेत देखील चौकशी सुरू आहे. यामुळे मात्र घरच्यांना मोठा धक्का बसला आहे.