त्यांच्याकडे गोळ्यांनी भरलेली बंदूक…!! गश्मीरने वडील रवींद्र महाजनी यांच्याबाबत उलघडली सत्याची दुसरी बाजू

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते रविंद्र महाजनी यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. शेजाऱ्यांना त्यांच्या घरातून वास आल्याने ही घटना उघडकीस आली होती. त्यानंतर सर्वच स्तरातून मोठी हळहळ व्यक्त करण्यात येऊ लागली. त्यांच्या पार्थिवाला मुलगा गश्मीरने अग्नी दिला. या घटनेनंतर गश्मीरवर अनेकांनी टीका केली.

इतके दिवस होऊनही आता प्रेक्षकांनी गश्मीरवर टीकेची झोड उठवली आहे. गश्मीरने वडील रविंद्र महाजनी यांच्याकडे लक्ष दिले नाही, त्यांची काळजी घेतली नाही, असे म्हणत अनेकजण त्याच्यावर टीका करत आहेत.

वडिलांचे अशा पद्धतीने निधन होणं आणि गश्मीरचे त्या ठिकाणी नसणे याबद्दल त्याला दोष देण्यात आला. यावर गश्मीरने लगेच काही प्रतिक्रिया देणे टाळले होते. याबाबत आता तो प्रतिक्रिया देत आहे. आता तो म्हणाला, माझे वडील हे राजा माणूस होते. शेवटपर्यंत ते ऐटीत जगले. त्यांनी कधीच कोणाची मदत घेतली नाही.

स्वत:ची काळजी घेण्यासाठी ते समर्थ होते. त्यांनी तशी ती सवय होती. त्यांचा तो स्वभाव होता. तसेच तो म्हणाला, त्यांना कधीच कोणत्याही प्रकारच्या सुरक्षतेची गरज नव्हती. त्यांना साधं कोणी मदतीसाठी विचारलं जरी असतं तरी त्यांनी त्याच्या मुस्काटात मारुन त्याला परत पाठवल असत. त्यांच्याकडे कायम परवाना असलेली आणि जीवंत गोळ्या असलेली बंदूक असायची. जी आम्हाला पोलिसांनीच त्यांच्या मृत्यूनंतर दिली, असा खुलासा देखील त्याने केला आहे.

वीस वर्षांपासून ते वेगळे राहत होते. मी माझ्या वडिलांना एका छोट्या घरात सोडले आणि मी लक्झरी आयुष्य जगत आहे, असे अनेकांना वाटत होते पण तसे काही नव्हते. त्यांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला होता. एक कुटुंब म्हणून आम्ही काहीही करू शकलो नाही.

आम्ही त्यांचे वेगळं होणं स्वीकारले कारण कोणावरही कुणासोबत राहण्याची सक्ती केली जाऊशकत नाही. त्यांना पाहिजे तेव्हा ते आमच्याकडे राहायला यायचे, आणि पुन्हा निघून जायचे. गेल्या तीन वर्षांत बाबांनी स्वतःला कुटुंबापासूनही दूर केले.