---Advertisement---

मुंबईत १७ वर्षीय तरुणाची हत्या, मृतदेहाचे ५ तुकडे केले, हत्येमागील धक्कादायक कारण आलं समोर…

---Advertisement---

मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. चेंबूर परिसरात एका १७ वर्षांच्या मुलाची हत्या करून त्याच्या मृतदेहाचे 5 तुकडे करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे पोलीस तपास करत आहेत.

याबाबत एकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्या घरातून मृतदेहाचे तुकडे हस्तगत केले आहेत. याप्रकरणी शफी उर्फ शफिक शेख याला अटक केली आहे. ईश्वर मारवाडी (१७) असे मृत मुलाचे नाव असून शफी हा त्याच्या मानलेल्या बहिणीचा पती आहे. मानलेली बहीण असूनही ईश्वर पत्नी आणि मेहुणीसोबत लगट करीत असल्याच्या संशयातून शफीने ही हत्या केल्याची माहिती आहे.

दरम्यान, शफीच्या सासूने अनाथ असलेल्या ईश्वरचा लहानपणापासून सांभाळ केला. तो शफीच्या पत्नीला बहीण मानायचा. एक दिवस ईश्वर हा शफीसोबत घराबाहेर पडला. त्याला घरी येण्यास उशीर झाला. याबाबत सासू रेश्मा आणि सासरे ललित पुत्रन यांनी शफी याच्याकडे ईश्वरबाबत विचारणा केली.

दरम्यान, त्यावर मंगळवारी सकाळी ईश्वर कुठे आहे ते सांगतो. असे शिफने सांगितले. नंतर शफीच्या हालचालीवर नजर ठेवण्यात आली. त्यांना संशय आल्याने ललित यांनी पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून मदत मागितली.

दरम्यान, शफीला पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने सर्व घटना सांगितली. ईश्वर याच्या गळ्यावर कोयत्याने वार करून हत्या केली. त्याच्या मृतदेहाचे पाच तुकडे करून घरातच ठेवले आहेत. असेही त्याने सांगितले. पोलिसांनी शफीचे घर गाठले. तेव्हा त्यांना धक्काच बसला.

दरम्यान, गुन्हा दाखल करून पोलिसांनी शफीला अटक केली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. घटनेने मात्र परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---