वातावरण बदलतंय! निवडणुकीआधी भाजपाला धक्का, आजी-माजी आमदारांसह १० नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश…

देशात सध्या मोदींच्या विरोधात विरोधक आक्रमक झाले असून त्यांची ताकद अनेक राज्यात वाढत आहे. आता मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. अशातच भारतीय जनता पार्टीला मोठा धक्का बसला आहे.

राज्यातील एका विद्यमान आमदाराने आणि एका माजी आमदाराने काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे याठिकाणी भाजपला मोठे आव्हान उभे केले आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांच्या उपस्थितीत भाजपा नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यात दोन आजी-माजी आमदारांसह भाजपाचे एकूण १० नेते काँग्रेसमध्ये आले आहेत. यामुळे काँग्रेसची ताकद वाढली आहे.

यामध्ये कोलारसचे भाजपा आमदार वीरेंद्र रघुवंशी आणि माजी भाजपा आमदार भंवर सिंह शेखावत यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि त्यांच्या समर्थकांचे पक्षातले वाढते महत्त्व हे या नेत्यांच्या पक्ष बदलण्यामागचे प्रमुख कारण सांगितले आहे.

तसेच डॉ. आशीष अग्रवाल, अशू रघुवंशी, छेदीलाल पांडे, शिवम पांडे, अरविंद धाकड, डॉ. केशव यादव आणि महेंद्र प्रताप सिंह यांनी कमलनाथ यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे काँग्रेसची ताकद वाढणार आहे.

तसेच गुड्डू राजा हे झाशीतून दोन वेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या सुजान सिंह बुंदेला यांचे पूत्र चंद्रभूषण सिंह बुंदेला उर्फ गुड्डू राजा यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे भाजपचे टेन्शन वाढले आहे.