नाशिकमधील विद्यार्थीनीने अवघ्या ६ हजार रुपयांसाठी संपवलं जीवन; आई-वडिलांना भेटुन वसतिगृहात येताच…

नाशिकमधून एक मनाला चटका लावून जाणारी बातमी समोर आली आहे. आई-वडिलांनी क्लासच्या फीसाठी दिलेले पैसे हरवले म्हणून 22 वर्षीय तरुणीने टोकाचा निर्णय घेतला आहे. या तरुणीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

श्रुती सानप असे या तरुणीचे नाव होते. ती मुळची बीड जिल्ह्यातील होती. ती नाशिकच्या सप्तश्रृंगी आयुर्वेद महाविद्यालयात शिक्षण घेत होती. ती येथील वसतिगृहात राहत होती. श्रुती ही दोन दिवसांपूर्वी आपल्या मूळगावावरुन परत आली होती.

तिला क्लास लावायचे होते. यासाठी तिने आईवडीलांकडून सहा हजार रुपये आणले होते. असे असताना प्रवासातच तिच्याकडून हे पैसे हरविलेले. यामुळे ती टेन्शनमध्ये होती. यामुळे तिने आत्महत्या केली असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, श्रुतीने अशाप्रकारे टोकाचा निर्णय घ्यायला नको होता, अशी प्रतिक्रिया तिच्या महाविद्यालयातून येत आहे. या घटनेमुळे नाशिक शहरातही हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

दरम्यान, सप्तश्रृंगी आयुर्वेद महाविद्यालयात बीएचएमएसच्या तिसऱ्या वर्षात ती शिकत होती. तिने तिच्या राहत्या खोलीत आत्महत्या केली. यामुळे याठिकाणी एकच खळबळ उडाली. पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली.

या घटनेने तिच्या घरच्यांना मोठा धक्का बसला. ती एक हुशार विद्यार्थी होती. याबाबत दुसरे काही कारण आहे का याबाबत पोलीस आता तपास करत आहेत. शैक्षणिक क्षेत्रात यामुळे खळबळ उडाली आहे.