घरी नेऊन कोल्ड्रिंकमधून गुंगीचं औषध पाजलं, अन् नंतर..; पुण्यात पोलीसाचं महीला पोलिसासोबत भयंकर कृत्य

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. लॉकडाऊनच्या काळात ओळख वाढून जेवणासाठी घरी येत असताना गुंगीचे औषध देऊन पोलीस शिपायाने महिला पोलीस कर्मचार्‍यावर बलात्कार केला.

या प्रकाराचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर सातत्याने बलात्कार करून पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

महिला पोलीस कर्मचार्‍याने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दीपक सिताराम मोघे या पोलीस शिपायावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार स्वारगेट पोलीस वसाहत तसेच खडकवासला येथील लॉजवर २०२० ते १ ऑगस्ट २०२३ दरम्यान घडला. या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

फिर्यादी आणि आरोपी हे दोघेही शहर पोलीस दलात नेमणूकीला असून स्वारगेट पोलीस वसाहतीत राहतात. लॉकडाऊनच्या कालावधीत आरोपी दीपक मोघे याने फिर्यादी महिलेशी ओळख वाढविली. या काळात त्यांच्या घरी जेवणास तो जात होता. यानंतर त्याने अनेकदा गैरकृत्य केले.

त्याने कोल्ड्रींकमधून फिर्यादीला गुंगीकारक औषध दिले. त्यामुळे फिर्यादीस उलट्यांचा त्रास होऊ लागला. तेव्हा त्याने फिर्यादीला गोळ्या खाण्यास दिल्या. त्यामुळे आणखी गुंगी येऊन त्यांना झोप लागली. तेव्हा त्याने फिर्यादीसोबत शारीरीक संबंध केले. त्याचा व्हिडिओ तयार केला.

हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादीचे पतीला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. फिर्यादीला पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच सोनं आणि पैसे देखील लंपास केले.